नोव्हेंबर परीक्षेआधी विद्यापीठ निकाल जाहीर करणार, विद्यापीठाच्या भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 05:03 AM2017-10-25T05:03:29+5:302017-10-25T05:03:44+5:30

मुंबई : आॅक्टोबर महिना उजाडूनही विद्यार्थ्यांना निकालासाठी मुंबई विद्यापीठात खेपा घालाव्या लागत आहेत. १९ सप्टेंबरला ४७७ निकाल जाहीर करून विद्यापीठाने पाठ थोपटून घेतली.

The university will announce the results before the November examinations, and the university's nonfiction | नोव्हेंबर परीक्षेआधी विद्यापीठ निकाल जाहीर करणार, विद्यापीठाच्या भोंगळ कारभार

नोव्हेंबर परीक्षेआधी विद्यापीठ निकाल जाहीर करणार, विद्यापीठाच्या भोंगळ कारभार

Next

मुंबई : आॅक्टोबर महिना उजाडूनही विद्यार्थ्यांना निकालासाठी मुंबई विद्यापीठात खेपा घालाव्या लागत आहेत. १९ सप्टेंबरला ४७७ निकाल जाहीर करून विद्यापीठाने पाठ थोपटून घेतली. पण, त्यानंतरही विद्यापीठाची परीक्षा संपलेली नाही. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला कंटाळून आता विद्यार्थी एकवटले असून मंगळवारी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन परीक्षा भवनासमोर आंदोलन केले. उरलेले सर्व निकाल नोव्हेंबर महिन्यात होणाºया परीक्षेच्या आधी जाहीर करण्याचे आश्वासन विद्यापीठाने दिले आहे.
विद्यापीठाचा विद्यार्थी अमेय मालशे याने विद्यार्थ्यांना एकत्र करून विद्यापीठाविरुद्ध आंदोलन पुकारले. मंगळवारी मालशे याने पुकारलेल्या आंदोलनाला विद्यार्थ्यांसह पालकांनीही साथ दिली. विद्यापीठातील परीक्षा भवनासमोर दुपारी १२ वाजता आंदोलनाला सुरुवात झाली. त्या वेळी उपकुलसचिव आणि माजी परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी येऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. या वेळी संबंधित अधिकाºयांची भेट घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली. पण, दुपारी ३ वाजेपर्यंत यापैकी कोणत्याही अधिकाºयांनी भेट न घेतल्याने उपस्थितांचा पारा चढला. त्या वेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने सुरक्षा अधिकाºयांमध्ये आणि आंदोलनकर्त्यांमध्ये शाब्दिक खटके उडाले. यामुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संध्याकाळी ५च्या सुमारास कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढली.
>विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा
परीक्षांचे शुल्क दुप्पट वाढवले आहे. यामुळे विद्यार्थ्यांवर आर्थिक भार पडणार आहे. हे परीक्षा शुल्क कमी करावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. विद्यापीठाचा कारभार प्रभारी खांद्यावर असल्याने ही मागणी पूर्ण कशी होणार, हा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
येत्या हिवाळी परीक्षा सुरू होण्याअगोदर पुनर्मुल्यांकनासह इतर सर्व निकाल जाहीर करण्यात येतील, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाने दिले. विधि अभ्यासक्रमाच्या ऐटीकेटी परीक्षांचे अर्ज करण्याच्या तारखेत ३० आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Web Title: The university will announce the results before the November examinations, and the university's nonfiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.