Join us

कोरोना जात नाही तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 12:11 PM

दबंग अधिकाऱ्याच्या चिमुकलीचा निर्णय, सोशल मिडियावर शुभेच्छाचा वर्षाव

मुंबई : पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी सध्या नागरिकांच्या सेवेसाठी घरच्यांकडे पाठ करत आपले कर्तव्य बजावत आहेत. अशातच बाबा पोलीस तर, आई डॉक्टर असलेल्या चिमुरडीने कोरोना जात नाही तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही असा हट्ट धरला आहे. एरवी वाढदिवस म्हंटला महागड्या गिफ्टसह बर्थडे पार्टीची ओढ़ चिमुकल्यांमध्ये असते. अशात मुलीचा असा समजूतदारपणा पाहुन आई बाबांनाही भरुन आले. ही मुलगी म्हणजे ड्रग्ज तस्कारांचे कंबरडे मोडणाऱ्या पोलीस उपायुक्त आयपीएस शिवदीप लांडे यांची कन्या आहे. 

              लॉकडाउनमुळे मुलांची शाळा सोडाच पण घराबाहेर खेळणही बंद झाल आहे. अशा या परिस्थितीत २४ तास घरात राहून हे बालगोपाल अक्षरशः वैतागून गेले आहेत. अशातच मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांची मुलगी अरहा शुक्रवारी पाच वर्षाची झाली. वाढदिवसानिमित्त मुलीने वडिलांकड़े केलेला हट्ट पाहुन त्यांनाही भरून आले. असा 

              'बाबा आप पोलीस मे हो और मम्मा हॉस्पिटल जा के ऑपरेशन करती है..आप लोग इस कोरोनाका कुछ तो करोना. अब मुझे स्कूल जाना है. दोस्तो के साथ खेलना है. जब तक ये कोरोना नहीं जाता तब तक मुझे जन्मदिन नही मनाना है' असे मुलीचे केविलवाणे शब्द एकूण त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.  

                 शिवदीप लांडे यांनी याबाबतची एक पोस्ट आणि मुलीसोबतचा फोटो  फेसबुकवर शेअर केला आहे. या पोस्टला अर्ध्या तासातच ११ हजाराहूंन अधिक जणांनी लाईक्स, 2 हजाराहून अधिक जणांनी याबाबत अभिमान वाटत असल्याचे सांगून अरहाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, १९० जणांनी त्यांची पोस्ट शेअर केली. शुक्रवारी दिवासभरात कोरोना जात नाही तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही...

दबंग अधिकाऱ्याच्या चिमुकलीचा निर्णय, सोशल मिडियावर शुभेच्छाचा वर्षाव

लोकमत न्यूज़ नेटवर्क

मुंबई : पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी सध्या नागरिकांच्या सेवेसाठी घरच्यांकडे पाठ करत आपले कर्तव्य बजावत आहेत. अशातच बाबा पोलीस तर, आई डॉक्टर असलेल्या चिमुरडीने कोरोना जात नाही तोपर्यंत वाढदिवस साजरा करणार नाही असा हट्ट धरला आहे. एरवी वाढदिवस म्हंटला महागड्या गिफ्टसह बर्थडे पार्टीची ओढ़ चिमुकल्यांमध्ये असते. अशात मुलीचा असा समजूतदारपणा पाहुन आई बाबांनाही भरुन आले. ही मुलगी म्हणजे ड्रग्ज तस्कारांचे कंबरडे मोडणाऱ्या पोलीस उपायुक्त आयपीएस शिवदीप लांडे यांची कन्या आहे. 

              लॉकडाउनमुळे मुलांची शाळा सोडाच पण घराबाहेर खेळणही बंद झाल आहे. अशा या परिस्थितीत २४ तास घरात राहून हे बालगोपाल अक्षरशः वैतागून गेले आहेत. अशातच मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांची मुलगी अरहा शुक्रवारी पाच वर्षाची झाली. वाढदिवसानिमित्त मुलीने वडिलांकड़े केलेला हट्ट पाहुन त्यांनाही भरून आले.

              'बाबा आप पोलीस मे हो और मा हॉस्पिटल जा के ऑपरेशन करती है..आप लोग इस कोरोनाका कुछ तो करोना. अब मुझे स्कूल जाना है. दोस्तो के साथ खेलना है. जब तक ये कोरोना नहीं जाता तब तक मुझे जन्मदिन नही मनाना है' असे मुलीचे केविलवाणे शब्द एकूण त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.  

                 शिवदीप लांडे यांनी याबाबतची एक पोस्ट आणि मुलीसोबतचा फोटो  फेसबुकवर शेअर केला आहे. या पोस्टला अर्ध्या तासातच २८ हजाराहूंन अधिक जणांनी लाईक्स, ७ हजाराहून अधिक जणांनी याबाबत अभिमान वाटत असल्याचे सांगून अरहाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर, ६६४ जणांनी त्यांची पोस्ट शेअर केली.

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस