Join us

अनलॉकमुळे पोलिसांवर ताण वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अनलॉक होताच मुंबईतल्या वाशी, दहिसर टोल नाक्यासह मुंबईच्या प्रवेशद्वारावर वाहनांची गर्दी पहावयास मिळाली. अशात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अनलॉक होताच मुंबईतल्या वाशी, दहिसर टोल नाक्यासह मुंबईच्या प्रवेशद्वारावर वाहनांची गर्दी पहावयास मिळाली. अशात नाकाबंदी करत वाहन तपासणीमुळे पोलिसांना नाकीनव आलेले पहावयास मिळाले.

तब्बल अडीच-तीन महिन्यांनंतर सोमवारी मुंबईसह राज्यभरातील लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील जिल्ह्यांची पाच स्तरांमध्ये वर्गवारी केली आहे. यामध्ये दुसऱ्या स्तरात समावेश असलेल्या मुंबईत सोमवारी लॉकडाऊन उघडताच सकाळपासून नागरिकांनी कामानिमित्त बाहेर पडण्यास सुरुवात केली.

मुलुंड टोल नाक्यासह आनंदनगर, वाशी, दहिसर टोल, ऐरोली अशा मुंबईच्या प्रवेशद्वाराबाहेर वाहनांच्या रांगा लागलेल्या पहावयास मिळाल्या. सोमवारी मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहन तपासणी सुरू होती. अशात, पोलिसांची दमछाक होताना दिसले. विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांना घरी धाडण्यात आले. तसेच विनाकारण गर्दी करू नका, असे आवाहनही वेळोवेळी पोलिसांकड़ून करण्यात येत आहे. या अनलॉकमुळे

विविध जबाबदारीचे ओझे असलेल्या पोलिसांवरचा ताणही वाढताना दिसून येत आहे.