Unlock: आयटीआय प्रशिक्षण संस्था सोमवारपासून होणार ‘अनलॉक’; मार्गदर्शक सूचना जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 02:55 AM2020-10-16T02:55:46+5:302020-10-16T02:56:12+5:30

प्रशिक्षण संचालनालयाच्या हालचालींना वेग, राज्यातील अनेक आयटीआय संस्थांच्या इमारती क्वारंटाइन सेंटर्स म्हणूनही वापरात आहेत,

Unlock: ITI training institute to be 'unlocked' from Monday; Guidelines released | Unlock: आयटीआय प्रशिक्षण संस्था सोमवारपासून होणार ‘अनलॉक’; मार्गदर्शक सूचना जाहीर

Unlock: आयटीआय प्रशिक्षण संस्था सोमवारपासून होणार ‘अनलॉक’; मार्गदर्शक सूचना जाहीर

googlenewsNext

सीमा महांगडे 

मुंबई : राज्यातील आयटीआय प्रशिक्षण संस्था सोमवारपासून पुन्हा अनलॉक होणार असून आयटीआय प्रशिक्षणार्थ्यांसाठी ही मोठी खूशखबर आहे. मिशन बिगिन अंतर्गत राज्य शासनाने राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि त्यांच्याशी संलग्न राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि राज्य कौशल्य विकास मिशन यांना प्रशिक्षणाची परवानगी दिली आहे.
राज्याच्या सर्व जिल्ह्यांतील आयटीआय प्रशिक्षण संस्थांचा आढावा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून२ दिवसांत घेतला जात आहे. आयटीआय प्रशिक्षण राज्यात पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी दिली.

राज्यातील अनेक आयटीआय संस्थांच्या इमारती क्वारंटाइन सेंटर्स म्हणूनही वापरात आहेत, अशांची माहिती घेऊन, त्यांना मार्गदर्शक सूचना पाठवल्या जाणार असल्याची माहिती कुशवाह यांनी दिली. तेथे शक्य नसल्यास त्या संस्थेतील विद्यार्थ्यांना नजीकच्या शासकीय तंत्रनिकेतन शाळांमध्ये प्रशिक्षण कसे देता येईल याचे मायक्रो प्लॅनिंग संबंधित संस्थेच्या प्राचार्यांकडून करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. जास्त मागणी असलेल्या ६ व्यवसाय अभ्यासक्रमाचे लर्नि$ंग मटेरिअल भारत स्किल्स या वेबपोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षणात काहीही अडचण येणार नाही. प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची उपस्थिती दर आठवड्याला दिल्ली येथील प्रशिक्षण महासंचालनालयाला कळविण्यात येणार आहे.

प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि शैक्षणिक हित जपत राज्यातील आयटीआय सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रत्येक प्रशिक्षण संस्थेच्या तयारी आणि प्रशिक्षणाचे प्लॅनिंग याचा आढावा घेतला जात आहे. लवकरच राज्यातील आयटीआय प्रशिक्षण अनलॉक होईल. - दीपेंद्र सिंह कुशवाह, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय

विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाला प्राधान्य देणार
मागील दोन वर्षे आणि एक वर्ष कालावधीच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या परीक्षा नोव्हेंबर २०२० मध्ये घेतल्या जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या ऑनलाइन प्रशिक्षणामार्फत त्यांचे थीअरी अभ्यासक्रम पूर्ण झाले आहेत. म्हणून आता त्यांच्या प्रशिक्षणाला प्राधान्य दिले जाणार आहे. या वर्षातील प्रवेश प्रक्रियेमध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे पहिले २ महिने आॅनलाइन शिक्षण घेऊन टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थीसंख्या आटोक्यात राहून विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग कायम राखले जाईल याची काळजी घेण्यात येणार आहे.

Web Title: Unlock: ITI training institute to be 'unlocked' from Monday; Guidelines released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.