Unlock 1: मुंबईसह राज्यभरात आजपासून काय अनलॉक होणार अन् काय बंद राहणार; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 09:08 AM2020-06-08T09:08:05+5:302020-06-08T09:14:26+5:30

आजपासून राज्यभरात तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. परंतु राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम असून मॉल्स-हॉटेल आणि मंदिरं बंदच ठेवली जाणार आहेत.

UnlockDown1: What will be unlocked in the maharashtra from today will be closed; Find out | Unlock 1: मुंबईसह राज्यभरात आजपासून काय अनलॉक होणार अन् काय बंद राहणार; जाणून घ्या

Unlock 1: मुंबईसह राज्यभरात आजपासून काय अनलॉक होणार अन् काय बंद राहणार; जाणून घ्या

Next

मुंबई: केंद्र सरकारनं देशभरात लॉकडाऊन-5 ची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारनंही लॉकडाऊन बाबतची नियमावली जाहीर केली. राज्य सरकारनंही ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आजपासून राज्यभरात तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. परंतु राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम असून मॉल्स-हॉटेल आणि मंदिरं बंदच ठेवली जाणार आहेत. तसेच लोकल, परिवहन सेवा, रिक्षा-टॅक्सी यांच्यावरील सध्याचे निर्बंध कायम असणार आहे.

खासगी कार्यालयांनाही या नियमावलीत सूट देण्यात आली आहे. खासगी कार्यालयं 10 टक्के किंवा 10 कर्मचारी घेऊन काम सुरु करण्यास आजपासून परवानगी दिली आहे. उरलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावं लागणार आहे. तसेच कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सॅनिटायझेशन, शारीरिक अंतर, मास्क यांचे नियम पाळावे लागणार आहेत.

विद्यापीठ, शाळा, कॉलेजमधील कर्मचारी विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी ई-कंटेट विकसित करणे, उत्तर पत्रिकांचं मुल्यमापन करणे, निकाल जाहीर करण्याची काम करु शकतात. मुंबई महानगर प्रदेशात प्रवासासाठी कोणतेही निर्बंध नसणार आहेत. मात्र आंतरराज्य आणि आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्यांवर नजर ठेवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

राज्यात या गोष्टींना परवानगी- 

आता मुंबई महानगर भागात (एमएमआर) कोणत्याही प्रतिबंधाशिवाय प्रवास करता येणार आहे.

राज्य शासन आणि मुंबई महापालिकेच्या आदेशानुसार सरकारी, खासगी कार्यालयातील कर्मचारी आणि स्वयंरोजगार असणारे यांना ओळखपत्र दाखवून आजपासून बेस्ट बसमधून प्रवास करता येणार आहे.

घराबाहेरील व्यायामासाठी परवानगी. समुद्र किनारे, खाजगी/सार्वजनिक मैदाने, उद्याने यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी सायकलिंग/धावणे/ जॉगिंगला काही अटींवर परवानगी. मैदानावरील व्यायामासाठी सकाळी ५ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सूट. 

प्लंबर, ईलेक्ट्रिशियन, पेस्ट-कंट्रोल, आणि इतर तंत्रज्ञ यांसारख्या व्यावसायिकांना कामे करता येतील. त्यासाठी मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे बंधनकारक.

मॉल आणि शॉपिंग काँम्पलेक्स व्यतिरिक्त बाजारपेठेतील अन्य दुकाने सकाळी ९ ते ५ वेळेत सम-विषम नुसार उघडी राहतील.

राज्यात या गोष्टींवर बंदी कायम- 

शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण संस्था, विविध शिकवणी वर्ग बंद.

लोकल वाहतूक, मेट्रो रेल्वे सेवा पूर्णपणे बंद.

केशकर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर बंद.

स्वतंत्र आदेश आणि मानक प्रक्रियेद्वारे (एसओपी) परवानगी नसलेल्या रेल्वे आणि आंतरदेशीय विमान प्रवासास बंदी.

चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, मोठे सभागृह आणि तत्सम इतर ठिकाणे

आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासास बंदी. (गृह मंत्रालयाच्या परवानगीने जात असलेले प्रवासी सोडून)

आंतरराष्ट्रीय सामाजिक, राजकीय, क्रीडा, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम तसेच मोठ्या समारंभांना बंदी

Web Title: UnlockDown1: What will be unlocked in the maharashtra from today will be closed; Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.