मुंबईतल्या बेशिस्त रिक्षा टॅक्सी चालकांवर आता चाप बसणार; पोलीस आयुक्तांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 12:03 PM2022-03-16T12:03:43+5:302022-03-16T12:05:01+5:30
टॅक्सी, रिक्षा वाहनांची संख्या वाढत आहे.
मुंबई : रेल्वे स्थानकाबाहेर बेकायदा पार्किंग करणाऱ्या बेशिस्त रिक्षा टॅक्सी चालकांवर आता मुंबईत चाप बसणार आहे. अशाप्रकारे वाहन पार्क तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकावर वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्यावर पोलीस थेट गुन्हा दाखल करत कारवाई करणार आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
संजय पांडे यांनी रिक्षा, टॅक्सी, उबेर तसेच अन्य टॅक्सी चालक संघटनासोबत बैठक घेत त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. टॅक्सी, रिक्षा वाहनांची संख्या वाढत आहे. त्यासाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे वाहने कशीही पार्क केली जातात. त्यांच्या तक्रारीतही वाढ झाली होती. रेल्वे स्थानकाबाहेर चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क केल्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत आहे. ज्याठिकाणी टॅक्सी, रिक्षा यांचा वाहन थांबा काढून टाकले असल्यास त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात दिली आहे.