विनाप्रशिक्षण दिले अवजड काम; ठरले मृत्यूचे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 02:41 AM2020-01-16T02:41:49+5:302020-01-16T02:42:11+5:30
मंगळवारी कुर्ला नेहरूनगर कार्यशाळेत शाळा क्रमांक ५ मध्ये सहायक अतांत्रिक आशिष गिरकर आणि भिसे बसच्या दुरुस्तीचे काम करत होते.
मुंबई : कुर्ला नेहरूनगर कार्यशाळेत एसटी बसची दुरुस्ती केली जात होती. यावेळी अचानक बस पुढे सरकल्याने अतांत्रिक सहायक मजदूर एस.एस.भिसे यांचा बसखाली येऊन मृत्यू झाला. भिसे यांच्या पदानुसार त्यांना हलकी कामे देणे आवश्यक होते. मात्र, त्यांना कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय अवजड कामे देण्यात आली होती. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा एसटी कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.
मंगळवारी कुर्ला नेहरूनगर कार्यशाळेत शाळा क्रमांक ५ मध्ये सहायक अतांत्रिक आशिष गिरकर आणि भिसे बसच्या दुरुस्तीचे काम करत होते. एसटी बसची दुरुस्त करत असताना जॅक निखळल्याने यांच्या अंगावर बस आली. यामध्ये ते बसखाली चिरडले गेले.
सहायक अ तांत्रिक विभागात काम करणाºया कर्मचाऱ्यांना कार्यशाळेत नियुक्ती करतेवेळी फक्त पाणी सोडणे, टायर फिटिंग करणे आणि कार्यालयातील शिपाई म्हणून काम बघणे असे एसटी महामंडळाच्या फेब्रुवारी, २०१८च्या परिपत्रकात दिले आहे. भिसे हे नुकताच सहायक अ तांत्रिक विभागात रुजू झाले होते. त्यांना प्रशिक्षण नसताना अवजड काम का देण्यात आले? असा प्रश्न कर्मचाºयाकडून उपस्थित होत आहे.
२७ डिसेंबर, २०१९ रोजी एसटी मुख्यालयातील लिफ्ट अपघातात रमाकांत पाटकर यांचा मृत्यू झाला. या घटनेची फक्त चौकशीच सुरू आहे. पाटकर आणि भिसे यांच्या कुटुंबीयांना नियमानुसार आर्थिक मदत देण्यात येणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाºयांनी माहिती दिली. मात्र, दोन्ही कर्र्मचाºयांच्या परिवारातील एका व्यक्तीला महामंडळात नोकरीसाठी घेण्यावर निर्णय घेण्यात आला नाही.
भिसे यांच्या पश्चात्त एक मुलगी, मुलगा आणि पत्नी आहे. भिसे यांच्या कुटुंबीयांनी एका व्यक्तीला महामंडळात घ्यावे, अशी मागणी केली आहे. दोन्ही मुलांच्या शैक्षणिक भविष्यासाठी महामंडळाने वेळेत सहकार्य करणे आवश्यक असल्याचे एसटी कर्मचाºयांनी सांगितले.