मार्च अखेरपर्यंत राज्यात साडेतीन कोटी वाहने, दुचाकी वाहनांची संख्या जास्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 07:21 AM2019-11-26T07:21:57+5:302019-11-26T07:22:11+5:30

राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षी मार्च अखेरपर्यंत राज्यातील वाहनांची संख्या ३ कोटी ५४ लाख ८८ हजार ६३५ एवढी झाली आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त शेखर यांनी दिली.

 Until the end of March, the number of vehicles in the state is 2.5 crore, and the number of two-wheelers is high | मार्च अखेरपर्यंत राज्यात साडेतीन कोटी वाहने, दुचाकी वाहनांची संख्या जास्त

मार्च अखेरपर्यंत राज्यात साडेतीन कोटी वाहने, दुचाकी वाहनांची संख्या जास्त

Next

मुंबई : राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या वर्षी मार्च अखेरपर्यंत राज्यातील वाहनांची संख्या ३ कोटी ५४ लाख ८८ हजार ६३५ एवढी झाली आहे, अशी माहिती परिवहन आयुक्त शेखर यांनी दिली.

मोटार वाहन विभागाच्या आकडेवारीनुसार, दुचाकी वाहन खरेदीकडे कल जास्त आहे. मार्च अखेरपर्यंत २,६०,२४,४७९ दुचाकी वाहने आहेत. त्यापाठोपाठ खासगी चार चाकी वाहनांचा क्रमांक लागतो. ४९,६६,७२३ एवढी खासगी वाहने राज्यात आहेत. यामध्ये कार आणि जीपचा समावेश आहे.

राज्यात कंत्राटी वाहने ६४,१२६ असून ५,१८,९३८ ट्रक, ४,१४,००८ ट्रेलर, ७,७२,०१७ ट्रॅक्टर, ४९,९९९ टँकर्स तर १,३३,८९७ एवढी इतर वाहने आहेत.
राज्यात मार्च अखेरपर्यंत साडेतीन कोटी वाहने आहेत. राज्यातील लोकसंख्या १२ कोटी आहे, त्या तुलनेत वाहनांची संख्या कमी आहे, असे परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी सांगितले.
रिक्षा, टॅक्सींची संख्या जास्त
राज्यात १५,९६२ रुग्णवाहिका आहेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी ३७,६०० बस तर २९,४०५ स्कूल बसेस आहेत. याशिवाय सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी राज्यात मोठ्या प्रमाणात असून त्यांची संख्या १३,२४,७९७ एवढी आहे. तर ११,२४,०३८ एवढ्या डिलिव्हरी व्हॅन आहेत.
 

Web Title:  Until the end of March, the number of vehicles in the state is 2.5 crore, and the number of two-wheelers is high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.