Video : ...तोपर्यंत धनंजय मुंडे याना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया
By पूनम अपराज | Published: January 12, 2021 08:24 PM2021-01-12T20:24:36+5:302021-01-12T20:25:33+5:30
Kirit somaiya Reaction on Dhananjay Munde : याप्रकरणात भाजपाने उडी घेतली असून भाजपा नेते यांनी मुंडे यांना जोपर्यंत आरोपातून मुक्त होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
कॅबिनेट मंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर मुंडे यांनी आपण 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली, असा धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात गदारोळ सुरु झाला आहे. याप्रकरणात भाजपाने उडी घेतली असून भाजपा नेते यांनी मुंडे यांना जोपर्यंत आरोपातून मुक्त होत नाही, तोपर्यंत मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
माझ्यावरचे आरोप खोटे, मला ब्लॅकमेल करणारे; धनंजय मुंडेंचा सविस्तर खुलासा
3 महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावे याबाबतचा व्हिडीओ किरीट सोमय्या यांनी ट्वीट केला आहे. तसेच त्या व्हिडीओमधून किरीट यांनी मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडून जे आरोप होत आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मिता, संस्कृतीला धक्का पोहचला असून जोपर्यंत धनंजय मुंडे यांची आरोपातून मुक्तता होत नाही, तोपर्यंत त्यांना मंत्रीमंडळात राहण्याचा अधिकार त्यांना नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
खळबळजनक! धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप, ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार
Having Relationship with 3 Women, Minister Dhananjay Munde must stay out from Maharashtra Cabinet till He gets Clean
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 12, 2021
3 महिलांशी संबंध असलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी सद्य परिस्थिति स्पष्ट, होईपर्यंत महाराष्ट्र मंत्रिमंडळातून बाहेर रहावे @BJP4Maharashtra@Dev_Fadnavispic.twitter.com/rsKS5H0kfU
मुंडे यांनी मांडलेली संपूर्ण वस्तुस्थिती
करूणा शर्मा नावाच्या एका महिलेसोबत मी 2003 पासून परस्पर सहमतीने संबंधांत होतो. ही बाब माझे कुटुंबीय, पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती. या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले झाली. सदर दोन्ही मुलांना मी माझे नाव दिले आहे. शाळेच्या दाखल्यापासून ते सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझेच नाव आहे, ही मुले माझ्यासोबतच राहतात. माझे कुटुंबीय, पत्नी आणि माझी मुले यांनी देखील या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतले असून स्वीकृती दिलेली आहे. करुणा शर्मा नावाची महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतोपरी पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे.
मी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सद् भावनेने केलेल्या आहेत. मात्र, 2019 पासून करूणा शर्मा त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जीविताला गंभीर शारीरिक इजा करण्याबाबत आणि धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊ ब्रिजेश शर्मा देखील सहभागी होता.
या बाबत 12 नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भात पोलीसांकडे तक्रार सुद्धा देण्यात आलेली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये करुणा शर्मा यांनी समाज माध्यामावर (सोशल मीडिया) माझी बदनामी करण्याच्या हेतूने आणि मला ब्लॅकमेल करण्याच्या हेतुने माझ्याशी संबंधित अगदी व्यक्तिगत व खाजगी साहित्य प्रकाशीत केले होते. त्यामुळे सदर प्रकरणी मी स्वतः हून न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात करुणा शर्मा विरुद्ध याचिका दाखल केली आहे.
महाराष्ट्राच्या अस्मिता, संस्कृतीला धक्का पोहचला असून जोपर्यंत धनंजय मुंडे यांची आरोपातून मुक्तता होत नाही, तोपर्यंत त्यांना मंत्री मंडळात राहण्याचा अधिकार त्यांना नाही, भाजपा नेते किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया pic.twitter.com/gArjZTrDld
— Lokmat (@MiLOKMAT) January 12, 2021