तोपर्यंत चीनसमोर झुकावे लागेल - सरसंघचालकांचा मोहन भागवत????

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:05 AM2021-08-17T04:05:32+5:302021-08-17T04:05:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित वस्तूंसाठी चीनवर जितके अवलंबून राहू, तितके चीनसमोर झुकावे लागेल, अशा शब्दांत ...

Until then, we have to bow before China - Mohan Bhagwat of Sarsanghchalak ???? | तोपर्यंत चीनसमोर झुकावे लागेल - सरसंघचालकांचा मोहन भागवत????

तोपर्यंत चीनसमोर झुकावे लागेल - सरसंघचालकांचा मोहन भागवत????

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित वस्तूंसाठी चीनवर जितके अवलंबून राहू, तितके चीनसमोर झुकावे लागेल, अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आर्थिक स्वातंत्र्याचा आग्रह धरला. आपल्या अटी, शर्तींवर व्यवहार असा स्वदेशीचा अर्थ आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार, व्यवहार करत असताना मूळ तंत्रज्ञानही आपल्या देशात येईल याची काळजी घ्यायला हवी, असे भागवत म्हणाले.

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त रविवारी राजा शिवाजी महाविद्यालयात मोहन भागवत यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर उपस्थितांसमोर बोलताना भागवत यांनी भारतीय अर्थव्यवस्था स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. आत्मनिर्भरतेवरच स्वतंत्र देशाची आर्थिक सुरक्षा अवलंबून आहे आणि अशा प्रकारची आर्थिक सुरक्षाच देशाला सर्व प्रकारची सुरक्षा देते. आज आपण इंटरनेट आणि मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर करतो. पण, त्याचे मूळ तंत्रज्ञान भारतीय नाही, ते बाहेरून येते. त्यामुळे एक समाज म्हणून आपण कितीही चीनबाबत ओरडलो, तरी आपल्या फोनमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या चीनमधूनच येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबून राहणे कमी होणार नाही, तोवर चीनसमोर झुकावे लागेल, असे मोहन भागवत म्हणाले. १५ ऑगस्ट १९४७ ला परकीय आक्रमणांवर आपण पूर्णविराम दिला. त्यासाठी अनेकांनी त्याग, बलिदान दिले. त्यामुळे आपण आपले जीवन आपल्या पद्धतीने चालवण्यासाठी मुक्त झालो. त्या सर्व हुतात्म्यांना स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचे भागवत म्हणाले.

जगातील तथाकथित महासत्तांनी प्रचंड नफेखोरीची अर्थव्यवस्था लादली आहे. भांडवलशाही आणि साम्यवाद या अर्थव्यवस्थांना आता पर्याय शोधले जात आहेत. भारतीय संस्कृतीत, परंपरेत मांडलेला अर्थविचार हा समग्र आणि एकात्म आहे. हा अर्थविचार कालसुसंगत आणि व्यावहारिक स्वरूपात जगासमोर मांडणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी तो आपल्या देशात उभारावा लागेल, असे भागवत म्हणाले. मूठभर बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रचंड उत्पादन आणि नफेखोरी या आर्थिक सूत्रातून आर्थिक दरी वाढतानाच पर्यावरणीय संकटे जगासमोर उभी केली आहेत. त्यामुळे विकेंद्रित उत्पादनाचा मार्ग निवडावा लागणार आहे. यातूनच देशात रोजगार वाढणार असल्याचे भागवत म्हणाले. यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, सहकार क्षेत्र, कुटिरोद्योगांना प्रोत्साहन द्यायला हवे. सरकारने स्वतः उत्पादन, व्यवसाय, व्यापारात पडण्यापेक्षा नियंत्रकाची भूमिका घ्यावी. उद्योगांना दिशा देणे, प्रोत्साहन देणे, कठीण काळात आधार देणे, उद्यमींना प्रोत्साहन देऊन त्यांचे संरक्षक बनणे इतकीच सरकारची भूमिका असायला हवी. सगळे काही सरकारी किंवा काहीच सरकारी नको अशा दोन्ही टोकांच्या भूमिकांपासून आपल्याला लांब राहावे लागेल, असेही भागवत म्हणाले.

Web Title: Until then, we have to bow before China - Mohan Bhagwat of Sarsanghchalak ????

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.