लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत, कोकण आणि गोव्याच्या तुरळक भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे, तर मुंबई किंचित ढगाळ आहे.
मराठवाडा आणि विदर्भात गेल्या २४ तासांत हवामान कोरडे होते. दुसरीकडे ईशान्य मध्य प्रदेश व लगतचा भाग ते विदर्भापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र व लगतच्या भागावर चक्रवात कायम आहे. पश्चिम विदर्भ ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत असलेले उत्तर-दक्षिण कमी दाबाचे क्षेत्र आता विरून गेले आहे. हवामानात होत असलेल्या या बदलामुळे राज्यात कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे. मुंबईत हवामान किंचित ढगाळ राहील.