अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 06:15 AM2018-03-06T06:15:43+5:302018-03-06T06:15:43+5:30

अल्पवयीन मुलाला जिवे ठार मारण्याची धमकी देत, त्याच्याच ४ मित्रांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार गोरेगावमध्ये सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणी चारही मुलांची दिंडोशी पोलिसांनी बालसुधारगृहात रवानगी केली आहे. या प्रकारामुळे पीडित मुलगा, त्याच्या पालकांना जबर धक्का बसला आहे.

 Untimely torture of a minor child! | अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार!

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार!

Next

मुंबई - अल्पवयीन मुलाला जिवे ठार मारण्याची धमकी देत, त्याच्याच ४ मित्रांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार गोरेगावमध्ये सोमवारी उघडकीस आला. या प्रकरणी चारही मुलांची दिंडोशी पोलिसांनी बालसुधारगृहात रवानगी केली आहे. या प्रकारामुळे पीडित मुलगा, त्याच्या पालकांना जबर धक्का बसला आहे.
रजत (नावात बदल) हा ११ वर्षांचा मुलगा गोरेगावच्या फिल्मसिटी रोड परिसरात आई, वडील, दोन बहिणींसह राहतो. त्याचे वडील रिक्षाचालक असून, आई घरकाम करते. १९ फेब्रुवारीला सहावीत शिकणारा रजत वर्गात गेला. मात्र, त्याला बेंचवर नीट बसता येत नव्हते. तो बराच अस्वस्थ वाटत होता. त्यामुळे शिक्षकांनी पालकांना बोलावले. पालकांनी त्याला जोगेश्वरीच्या ट्रामा केअर रुग्णालयात तपासणीसाठी नेले, तेव्हा डॉक्टरांनी दिंडोशी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचे पत्र देत, कूपर रुग्णालयात जाण्याचा सल्ला पालकांना दिला.
पालकांनी दिंडोशी पोलिसांत जाऊन रुग्णालयाने दिलेले पत्र दाखविले. त्यानंतर, कूपर रुग्णालयात मुलाला दाखल केले. त्या वेळी रजतवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. दोन महिने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार सुरू होते. या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेली मुले १२ ते १६ वयोगटांतील आहेत. यातील तिघे रजतसोबत शिकतात, तर १६ वर्षीय मुलगा पिंपरीपाड्यातील इंग्रजी शाळेत शिकतो.

नाल्यात अत्याचार

रजत रात्रीच्या वेळी बाहेर खेळत असायचा. त्याला मी विश्वासात घेऊन विचारले, तेव्हा मालाडच्या अपना बाजार दुकानाच्या मागील मोठ्या नाल्यात नेऊन त्यांनी त्याला जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर त्याच्यावर अत्याचार केले. मालाडच्या रहेजा कॉम्प्लेक्समागे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये नेऊनदेखील त्याचा लैंगिक छळ करण्यात आल्याचे त्याने सांगितल्याचे, रजतच्या आईने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. त्याला आम्ही पुढील शिक्षणासाठी होस्टेलला पाठविणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

 

Web Title:  Untimely torture of a minor child!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.