मेट्रो३ च्या पॅकेज ७ मधील भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 07:43 PM2018-09-24T19:43:08+5:302018-09-24T22:56:06+5:30

३३.५  किमी पल्ल्याची  देशातील पहिली भुयारी मेट्रो  कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३च्या भुयारीकरणाच्या  पाहिल्या टप्प्याचे  अनावरण  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. हा अनावरण सोहळा छत्रपती शिवाजी  महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-टर्मिनल २ या ठिकाणी पार पडला.

The unveiling of first phase of grounding in Package 7 of Metro 3 | मेट्रो३ च्या पॅकेज ७ मधील भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण  

मेट्रो३ च्या पॅकेज ७ मधील भुयारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे अनावरण  

Next

मुंबई : ३३.५  किमी पल्ल्याची  देशातील पहिली भुयारी मेट्रो  कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३च्या भुयारीकरणाच्या  पाहिल्या टप्प्याचे  अनावरण  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. हा अनावरण सोहळा छत्रपती शिवाजी  महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ-टर्मिनल २ या ठिकाणी पार पडला. २५० अभियंते, तंत्रज्ञ आणि कुशल  कामगार यांच्या  सातत्यपूर्ण मेहनतीमुळे मुंबई मेट्रो३ पॅकेज ७  मधील १.२६ किमी इतके भुयारीकरण आज पूर्ण झाले. वैनगंगा १ या टनेल बोअरिंग मशीनने २५९ दिवसांत हे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण करून एक  इतिहास रचला आहे.

"मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न खऱ्या अर्थाने सोडविण्यासाठी राज्य शासनाने मेट्रो चे विस्तृत जाळे उभे करण्यास सुरुवात केली आहे. त्यातील मेट्रो 3 या महत्वाच्या मार्गिकेतील पहिल्या भुयारी टप्प्याच्या अनावरण सोहळ्याचे साक्षीदार होताना मला विशेष आनंद  होत आहे. मुंबई करांना लवकरच उपलब्ध होणाऱ्या वेगवान, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची ही नांदी आहे", असे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

मुंबई शहराचा  भूगर्भ बेसाल्ट, ब्रेशिया तसेच टुफ अशा प्रकारच्या कठीण खडकांचा असून त्यांना भेदत भुयारीकरण करून  'वैनगंगा १' या टनेल बोअरिंग मशीन ने  आपले काम केले आहे.  हे शांघाय  टनेलिंग इंजिनीयरिंगकंपनीने तयार केलेले मशीन ९२ मी लांबीचे असून  प्रतिदिन ४.६ मी इतक्या वेगाने  भुयारीकरण करते. या मशीनने सध्या कार्यरत असलेली मेट्रो लाईन१ आणि  सहार उन्नत मार्ग यासारख्या  महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या खालून भुयारीकरण करून अत्यंत सुरक्षितपणे आपले ध्येय साध्य केले आहे. 

मुंबई मेट्रो३ चे  पॅकेज ७ मरोळ नाका येथे  वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर  मेट्रो १ आणि जेव्हीएलआर येथे  स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-कांजूरमार्ग-विक्रोळी मेट्रो ६ यांना  जोडणार आहे. तसेच मुंबई  उपनगरीय रेल्वे  सेवेने न जोडली  गेलेली एमआयडीसी, सीप्झ यासारखी  महत्वाची औद्योगिक आणि रोजगार केंद्रेही  जोडणार आहे .

मुंबई मेट्रो रेल  कॉर्पोरेशनने अनेक आव्हानांना  समर्थपणे तोंड देऊन हा यशाचा  टप्पा गाठला आहे. "माननीय   मुख्यमंत्र्यांचे प्रभावी नेतृत्व , मुख्यमंत्री  कार्यालयातील  वॉररूमचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन , सर्व  भागधारक , आणि मुंबईकर  नागरिकांचा भक्कम पाठिंबा  आणि सहकार्य  यामुळे मुंबई मेट्रो ३ च्या टीमला  प्रकल्पातील अडथळे पार करून,या महाप्रकल्पाचे स्वप्न वेळेत पूर्ण करण्याची प्रेरणा वेळोवेळी मिळत  आहे," असे एमएमआरसीच्या  व्यवस्थापकीय  संचालक श्रीमती अश्विनी भिडे  म्हणाल्या. 

मुंबई मेट्रो रेल  कॉर्पोरेशनच्या पूर्ण  प्रकल्पातील सुमारे ९ किमी इतके  भुयारीकरण पूर्ण  झाले असून १९,४०,२५४  क्यु मी इतक्या मातीचे उत्खनन करण्यात  आले आहे. पॅकेज ७ चे हे काम एल अँड टी आणि शांघाय इंजिनियरिंग  कंपनी संयुक्त भागीदारीत करत आहेत. पॅकेज ७ मधील  भुयारीकरणचा हा टप्पा ७.०७ किमीइतका असून त्यातूनएकूण ११ लाख क्यु मी इतकी माती  उत्खनित होणार  आहे. ती तळवली पिसे येथे  निर्धारित  शासकीय जागेत टाकली जाईल. आतापर्यंत २.५ लाख क्यु मी  इतकी माती  उत्खनित करण्यात आली आहे.

Web Title: The unveiling of first phase of grounding in Package 7 of Metro 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.