कसाबची ओळख पटवणारा कुटुंबाला झाला नकोसा, 'तो' रस्त्यावरच पडलेला आढळला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 10:42 PM2020-05-05T22:42:02+5:302020-05-05T22:49:23+5:30

एनजीओने श्रीवर्धनकर यांना आंघोळ घातली आणि त्यांचे वाढलेले केस कापले.

Unwanted by family man who identified Kasab for 26/11 attacks, found lying on road pda | कसाबची ओळख पटवणारा कुटुंबाला झाला नकोसा, 'तो' रस्त्यावरच पडलेला आढळला

कसाबची ओळख पटवणारा कुटुंबाला झाला नकोसा, 'तो' रस्त्यावरच पडलेला आढळला

Next
ठळक मुद्देगायकवाड यांनी संपूर्ण दिवस शोधमोहिम करुन महालक्ष्मी येथील मुंबई महानगरपालिक कॉलनीतील श्रीवर्धनकर यांच्या भावाला शोधून काढले. अधिक विचारपूस केल्यानंतर ते कसाबच्या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार राहिल्याचे समजले.

मुंबई - २६/११ मुंबईतील भीषण दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला क्रुरकर्मा अजमल कसाबच्या गोळीबारातून वाचलेले आणिकसाबविरोधात साक्ष देणारे हरीशचंद्र श्रीवर्धनकर निराधार आयुष्य रस्त्यावर जगत आहेत. ६० ओलांडलेले हे वयोवृद्ध आता कुटुंबाला नकोसे झाल्यामुळे श्रीवर्धनकर यांना उतारवयात रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे. नुकतेच मुंबईच्या रस्त्यावर एका दुकानदाराने त्यांना पाहिले आणि माणुसकी दाखवत आसरा दिला.

त्यांच्याशी अधिक विचारपूस केल्यानंतर ते कसाबच्या खटल्यातील महत्त्वाचे साक्षीदार राहिल्याचे समजले. मुंबईतील चिंचपोकळी येथील सातरस्ता येथील दुकानाचे दुकानदार डिन डिसूजा यांना श्रीवर्धनकर रस्त्यावर बसल्याचे आढळून आले होते. माणुसकीच्या नात्याने त्यांनी त्यांना आसरा दिला. अन्न - पाण्याशिवाय श्रीवर्धनकर हे वृद्ध आजोबा रस्त्यावर राहत होते. श्रीवर्धनकर यांना त्यांच्या कुटुंबाने घराबाहेर काढले असून नाईलाजाने त्यांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.

राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावरून कोसळून १५ वर्षीय मुलीचा मृत्यू

 

जुगार अड्ड्यावर छापा, रोख आणि मोबाइलसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त 

 

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये केस कापण्यास नकार दिल्याने न्हाव्याची हत्या

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान श्रीवर्धनकर यांना एक गोळी देखील लागलेली आहे. दहशतवादी कसाबला फाशी देण्यात श्रीवर्धनकर हे मुख्य साक्षीदारांपैकी एक होते. डिसुजा यांनी सांगितले की, जेव्हा श्रीवर्धनकर त्यांना रस्त्यावर आढळले तेव्हा त्यांनी त्यांच्या गायकवाड नावाच्या मित्राला याची माहिती दिली. गायकवाड एक एनजीओ चालवतात. एनजीओच्या सदस्यांनी जेव्हा श्रीवर्धनकर यांना जेवण दिले तेव्हा त्यांनी ते खाण्यास नकार दिला. नंतर एनजीओने श्रीवर्धनकर यांना आंघोळ घातली आणि त्यांचे वाढलेले केस कापले आणि अधिक माहितीसाठी त्यांच्याकडे चौकशी केली. 

गायकवाड यांनी संपूर्ण दिवस शोधमोहिम करुन महालक्ष्मी येथील मुंबई महानगरपालिक कॉलनीतील श्रीवर्धनकर यांच्या भावाला शोधून काढले. तेव्हा ते कल्याणला राहत असल्याची माहिती मिळाली. तसेच २६/११ च्या भीषण दहशतवादी हल्ल्यात त्यांचा असलेला सहभागाबद्दल माहिती मिळाली. यानंतर गायकवाड यांनी आग्रीपाडा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनीही तात्काळ कल्याण येथे राहणाऱ्या मुलाला प्रवासाचा पास देऊन श्रीवर्धनकर यांना कल्याणमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. १ मेला श्रीवर्धनकर यांनी कल्याण जाण्यासाठी मुंबई सोडली. मात्र, धक्कादायक  म्हणजे गायकवाड यांनी सांगितले की, श्रीवर्धनकर यांच्या कुटुंबाला त्यांना आपल्या घरी ठेवायचे नाही. ते त्यांना वृद्धाश्रमात ठेवण्यासंबंधी त्यांच्याकडे विचारणा करत होते. त्यानंतर गायकवाड यांनी देशासाठी महत्त्वाचे कार्य करणाऱ्या श्रीवर्धनकर यांना मदत करावी, असे आवाहन त्यांच्या एनजीओमार्फत केले आहे.अशी माहिती इंडिया टु डेने दिली आहे.

Web Title: Unwanted by family man who identified Kasab for 26/11 attacks, found lying on road pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.