अपडेट करा फेसबुक अॅप, झुकरबर्गने युजर्संना दिलयं 'गिफ्ट खास'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 04:49 PM2018-08-21T16:49:37+5:302018-08-21T16:54:26+5:30

फेसबुक नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे युजर्संचे सर्वाधिक आवडते अॅप बनले आहे. त्यामुळेच फेसबुक युजर्संची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नव्या कल्पनाचा वापर आणि युजर्संसाठी काहीतरी हटके देण्याचा फेसबुक टीमचा नेहमीच

Update Facebook app, Zuckerberg gives you 'Gift Special' | अपडेट करा फेसबुक अॅप, झुकरबर्गने युजर्संना दिलयं 'गिफ्ट खास'

अपडेट करा फेसबुक अॅप, झुकरबर्गने युजर्संना दिलयं 'गिफ्ट खास'

Next

मुंबई - फेसबुक नेहमीच आपल्या नाविन्यपूर्ण संकल्पनेमुळे युजर्संचे सर्वाधिक आवडते अॅप बनले आहे. त्यामुळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये फेसबुक युजर्संची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नव्या कल्पनाचा वापर आणि युजर्संसाठी काहीतरी हटके देण्याचा फेसबुक टीमचा नेहमीच प्रयत्न असतो. आता, फेसबुकचे अॅप अपडेट केल्यास युजर्संना नवीन सुविधा मिळत आहेत. त्यामध्ये युजर्संना थेट स्वत:च्या प्रोफाईल पेजवर जाता येते. तसेच इतरही हटके चेंजेस फेसबुकने केले आहेत.

फेसबुकने अॅपमध्ये अनेक चांगले बदल केले आहेत. त्यासाठी युजर्संना फेसबुक अॅप अपडेट करुन घ्यावे लागणार आहे. युजर्संने अॅप अपडेट  केल्यानंतर त्यास नवीन अपडेटेड व्हर्जन मिळणार आहे. फेसबुकच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये तुम्ही लाईक केलेल्या फेसबुक पेजेसवरील व्हिडिओ तुम्हाला थेट होमपेजवरुन पाहता येणार आहेत. तुमच्या सर्चिंग आणि आवडीच्या व्हिडिओला येथे प्राधान्य मिळते. तसेच यापूर्वी तुम्हाला तुमचे प्रोफाईल पाहायचे असल्यास फेसबुक पेजवर तुमचे नाव सर्च करावे लागत होते. मात्र, नवीन अपडेटेड व्हर्जननुसार तुम्ही फेसबुकच्या होमपेजवरुन थेट तुमच्या प्रोफाईल पेजवर जाऊ शकता. त्यासोबतच, फेसबुक प्रोफाईल किंवा कव्हर पेज बदलण्यासाठीही फेसबुकने नवीन कल्पना दिल्या आहेत. कव्हर फोटोमध्ये तुम्हाला अनेक फोटो एकत्र करुन फोटो कोलाज करता येणार आहे. तर, आर्टवर्क नावाचा नवीन ऑप्शनही फेसबुकने दिला आहे. त्यामुळे तुम्हाला क्रिएटीव्ह फेसबुक कव्हर फोटो किंवा कव्हर पेज तयार करता येईल. 

फेसबुक प्रोफाईल फोटोमध्येही तुम्हाला अशीच क्रिएटीव्हीटी करता येणार आहे. अॅड डिझाईन या ऑप्शनद्वारे तुम्ही फेसबुकमध्ये क्रिएटीव्ह फ्रोफाईल तयार करु शकता. तसेच फेसबुकचा फ्रोफाईल म्हणून तुम्हाला व्हिडिओ वापरता येणार आहे. यापूर्वी व्हॉट्सअॅपने ही सुविधा दिली होती. मात्र, आता फेसबुकच्या प्रोफाईलवरही तुम्हाला व्हिडिओ अपलोड करता येईल. फेसबुकचे हे छोटे बदलही युजर्संना मोठ्या प्रमाणात भावले आहेत. क्रिएटीव्ह टीम असलेल्या फेसबुकची ही क्रिएटीव्हीटी नक्कीच तुम्हालाही आवडेल, त्यासाठी लगेच अपडेट करा फेसबुकचे नवीन व्हर्जन. दरम्यान, यापूर्वी फेसबुकने दिलेला स्माईलीची (इमोजी)  कल्पना युजर्संना चांगलीच पसंत पडली आहे. युजर्संने या कल्पनेचे भरभरुन स्वागत करत, प्रतिसाद दिला आहे.

Web Title: Update Facebook app, Zuckerberg gives you 'Gift Special'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.