राजधानी एक्स्प्रेसला तेजसचे अद्ययावत डबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:06 AM2021-07-20T04:06:54+5:302021-07-20T04:06:54+5:30

मुंबई : पश्चिम रेल्वेने राजधानी एक्स्प्रेसला नवीन सुधारित ''तेजस'' प्रकारचे शयनयान डबे जोडणार आहे. अद्ययावत 'स्मार्ट' सुविधांनी युक्त ...

Updated coaches of Tejas to Rajdhani Express | राजधानी एक्स्प्रेसला तेजसचे अद्ययावत डबे

राजधानी एक्स्प्रेसला तेजसचे अद्ययावत डबे

Next

मुंबई : पश्चिम रेल्वेने राजधानी एक्स्प्रेसला नवीन सुधारित ''तेजस'' प्रकारचे शयनयान डबे जोडणार आहे. अद्ययावत 'स्मार्ट' सुविधांनी युक्त असे सोनेरी रंगाचे हे डबे आहेत. या डब्यांमुळे उच्चभ्रू अशा थाटाचा अनुभव प्रवाशांना मिळणार आहे. या दिमाखदार अद्ययावत गाडीने सोमवारी आपला पहिला प्रवास सुरू केला.

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातील मुंबई-नवी दिल्ली राजधानी विशेष एक्स्प्रेसचे सध्याचे डबे बदलून त्या जागी आता नवीन तेजस प्रकारचे कोरे करकरीत शयनयान पद्धतीचे डबे जोडले गेले आहेत. अशा प्रकारचे डबे जोडलेले दोन डब्यांसह राजधानी एक्स्प्रेस म्हणून धावण्यासाठी सज्ज आहेत. या दोन डब्यांपैकी, एकामध्ये फक्त तेजस स्मार्ट शयनयान पद्धतीचे डबे आहेत आणि भारतीय रेल्वेमधील अशा प्रकारची ती पहिलीच गाडी आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या आरामासाठी नवीन गाडीमध्ये खास स्मार्ट सुविधा असणार आहेत. या माध्यमातून प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा पुरविण्याचे स्मार्ट डब्यांचे उद्दिष्ट आहे. यामध्ये प्रवासी माहिती आणि डबे गणना एकक बसवलेले असून, त्यास जीएसएम कनेक्टिव्हिटीही असणार आहे. दूरस्थ सर्व्हरशी ही प्रणाली जोडलेली असेल. या प्रणालीमध्ये सुरक्षा आणि आरामाशी संबंधित विविध उपकरणांकडून मिळणारी माहिती नोंदली जाईल.

-----------------

डिजिटल डेस्टिनेशन बोर्डः फ्लशसारखा एलईडी डिजिटल डेस्टिनेशन बोर्ड बसवण्यात आला आहे. पहिल्या ओळीत गाडीचा क्रमांक आणि कोच प्रकार आहे तर दुसऱ्या ओळीत विविध भाषांमध्ये गंतव्यस्थान आणि मधल्या स्थानकाचा स्क्रोलिंग मजकूर दाखवण्यात येतो.

सुरक्षा आणि देखरेख : प्रत्येक कोचमध्ये ६ कॅमेरे बसवण्यात आले आहेत जे लाईव्ह रेकॉर्डिंग देतात. डे नाईट व्हिजन क्षमतेसह सीसीटीव्ही, कमी प्रकाशाच्या स्थितीत चेहऱ्याची ओळख पटवणे , नेटवर्क व्हिडिओ रेकॉर्डर उपलब्ध आहे.

ऑटोमॅटिक प्लग दरवाजा: सर्व मुख्य प्रवेशद्वारे गार्डद्वारे नियंत्रित आहेत. सर्व दरवाजे बंद होईपर्यंत गाडी सुरू होणार नाही.

फायर अलार्म, डिटेक्शन आणि सप्रेशन प्रणाली - सर्व डब्यांमध्ये ऑटोमॅटिक फायर अलार्म आणि डिटेक्शन प्रणाली उपलब्ध आहे. पॅन्ट्री आणि पॉवर कारमध्ये स्वयंचलित अग्नि शमन प्रणाली आहे.

सुधारित शौचालय युनिट: अँटी-ग्राफिटी कोटिंग, जेल कोटेड शेल्फ, नवीन डिझाइनचे डस्टबिन, डोअर लॅच अ‍ॅक्टिवेटेड लाइट, एंगेजमेंट डिस्प्ले बसवण्यात आले आहेत.

लॅव्हॅटरीजमध्ये पॅनिक बटणः कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक लव्हॅरेटरीमध्ये बसवले आहे.

टॉयलेट एनॉनसिएशन सेन्सर इंटिग्रेशन (TASI): प्रत्येक कोचमध्ये दोन टॉयलेट एनाॅनसिएशन सेन्सर इंटिग्रेशन बसवण्यात आले आहे, जे कुणी आत असेल तेव्हा काय करावे आणि काय करू नये, याबाबत माहिती दाखवेल.

Web Title: Updated coaches of Tejas to Rajdhani Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.