पेटीएमला केवायसी अपडेट करणे व्यावसायिकाला पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 05:45 AM2019-11-12T05:45:44+5:302019-11-12T05:45:55+5:30

कांदिवलीत एका व्यावसायिकाला पेटीएम अ‍ॅपचे केवायसी अपडेट करणे महागात पडले.

Updating KYC to Paytm | पेटीएमला केवायसी अपडेट करणे व्यावसायिकाला पडले महागात

पेटीएमला केवायसी अपडेट करणे व्यावसायिकाला पडले महागात

Next

मुंबई : कांदिवलीत एका व्यावसायिकाला पेटीएम अ‍ॅपचे केवायसी अपडेट करणे महागात पडले. यात त्यांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी चारकोप पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
चारकोप परिसरात कुटुंबासह राहणारे राजेश (५७) यांचा प्लंबिंग आणि सॅनिटेशनचा व्यवसाय आहे. आर्थिक व्यवहारांसाठी ते पेटीएम अ‍ॅप वापरत आहेत. पेटीएमचे केवायसी अपडेट करण्यासाठी ६ तारखेला त्यांना संदेश आला. सुरुवातीला त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. रविवारी पुन्हा त्यांना कॉल आला. फोनवरून बोलत असलेल्या व्यक्तीने पेटीएमचे केवायसी अपडेट बाकी असल्याचे सांगितले. पेटीएम सेवा बंद होण्याची भीती घालून क्विक सपोर्ट अ‍ॅपद्वारे अपडेट करण्यास सांगितले. त्यामुळे त्यांनी अ‍ॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड केले. ठगाच्या सांगण्यावरून प्रक्रिया पूर्ण करताच त्यांच्या खात्यातून १० रुपयांऐवजी ६ हजार रुपये गेले.

Web Title: Updating KYC to Paytm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.