माहिती-तंत्रज्ञानाद्वारे मुंबई महापालिका होतेय अद्ययावत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 06:32 AM2019-02-21T06:32:02+5:302019-02-21T06:33:22+5:30
संगणक आधारित प्रशासकीय संनियंत्रण हे सुविधापूर्ण, वेगवान, सक्षम व प्रभावी होण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. या अंतर्गत पालिकेद्वारे नागरिकांना मिळणाऱ्या विविध ६० सेवा आतापर्यंत आॅनलाइन केल्या आहेत.
मुंबई : माहिती-तंत्रज्ञानावर आधारित विविध सेवासुविधा, प्रशासकीय संनियंत्रण प्रभावी व्हावे, याकरिता उपयोगात असलेल्या विविध प्रणालींचा दर्जा सुधारण्यासह आणखी काही सुविधा नागरिकांना घरबसल्या उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महापालिकेने ३७५ कोटींची तरतूद माहिती तंत्रज्ञान विषयक बाबींसाठी केली आहे.
प्रशासकीय कामकाजामध्ये सुधारणा, महसूल संकलनात वाढ, तसेच कार्यपद्धतींमध्ये सुसूत्रता यावी, याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून माहिती-तंत्रज्ञान आधारित सेवा सक्षम व्हाव्यात, वेळोवेळी अद्ययावत व्हाव्यात, यासाठी प्रयत्न सातत्याने येत आहे. परवानग्या, दाखले, अनुज्ञप्ती पत्रे यासारख्या सेवा माहिती-तंत्रज्ञानाच्या आधारे नागरिकांना घरबसल्या उपलब्ध होत असतानाच, विविध खात्यांमधील माहितीचे आदान-प्रदान सुलभ व्हावे, कर्मचारी व्यवस्थापन अधिकाधिक चांगले व्हावे, यासाठी माहिती-तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात येत आहे.
संगणक आधारित प्रशासकीय संनियंत्रण हे सुविधापूर्ण, वेगवान, सक्षम व प्रभावी होण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. या अंतर्गत पालिकेद्वारे नागरिकांना मिळणाऱ्या विविध ६० सेवा आतापर्यंत आॅनलाइन केल्या आहेत. पुढील आर्थिक वर्षात आणखी ५३ सेवा आॅनलाइन केल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने व्यवसाय-पूरक विविध परवाने, कारखाना परवाने, छायाचित्रीकरण परवानग्या यांचा समावेश आहे. पर्जन्यजल वाहिन्या खात्यासाठी काम करणाºया वाहनांसाठी वे ब्रिज मॅनेजमेंट सीस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. विविध खात्यांच्या भौगोलिक माहितीचे एकात्मीकरण व संलग्नीकरण प्रत्यक्षात आल्याने प्रशासकीय कार्यवाहीचा वेग वाढला आहे. अद्ययावतीकरणामुळे पर्जन्यजल वाहिन्या, मलनि:सारण प्रकल्प, जल अभियंता, विकास अभियंता इत्यादी खात्यांमधील माहितीचे आदान-प्रदान सुलभ होणार आहे.
३७५ कोटींची तरतूद : नागरिकांशी संबंधित ६० सेवा ऑनलाइन
‘सॅप हाना’चा करणार वापर
च्माहिती-तंत्रज्ञानावर आधारित सुविधा आणि प्रशासकीय बाबींसाठी सॅप प्रणालीचा उपयोग करण्यात येत आहे.
च्येत्या वर्षात या प्रणालीची सुधारित आवृत्ती ‘सॅप हाना’चा वापर करण्याचे प्रस्तावित आहे.
संगणकीय माहिती सुरक्षितपणे साठविण्यासाठी क्लाउड पद्धतीचा उपयोग करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.
च्विविध खात्यांतील आठ हजारांपेक्षा अधिक वाहनांचा मागोवा घेण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन खाते व माहिती-तंत्रज्ञान खाते यांच्याद्वारे संयुक्तपणे कमांड आणि कंट्रोल रूम उभारण्याचे प्रस्तावित आहे.