सिद्धिविनायकाचरणी ७५० किलोचा मोदक अर्पण, सेल्फी काढण्यासाठी उपस्थितांनी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 11:52 PM2017-09-02T23:52:31+5:302017-09-03T06:28:43+5:30

मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाही ७५० किलो वजनाचा माव्याचा मोदक, प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आला. एबीपी माझा वृत्तवाहिनीतर्फे आयोजित या कार्यक्रमाचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे.

Upgradation of 750 kg of Siddhivinayakacharya, attendees crowd to remove selfies | सिद्धिविनायकाचरणी ७५० किलोचा मोदक अर्पण, सेल्फी काढण्यासाठी उपस्थितांनी गर्दी

सिद्धिविनायकाचरणी ७५० किलोचा मोदक अर्पण, सेल्फी काढण्यासाठी उपस्थितांनी गर्दी

Next

मुंबई, दि. 02 - मागील दोन वर्षांप्रमाणे यंदाही ७५० किलो वजनाचा माव्याचा मोदक, प्रभादेवी येथील श्रीसिद्धिविनायकाच्या चरणी अर्पण करण्यात आला. एबीपी माझा वृत्तवाहिनीतर्फे आयोजित या कार्यक्रमाचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे. या वेळी परिवहनमंत्री दिवाकर रावते, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर, श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अभिनेता सुशांत शेलार उपस्थित होते.
दूध, साखर आणि माव्याच्या सहाय्याने तयार केलेला ‘महामोदक’, प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथून सिद्धिविनायक मंदिराकडे आणण्यात आला. या दरम्यान प्रभादेवी येथील रस्त्यावर आणि सिद्धिविनायक मंदिर परिसरात महामोदक पाहण्यासाठी गर्दी झाली होती. महामोदक तयार करण्यासाठी १५ आचारी ९ दिवस काम करत होते. दहा फूट उंचीच्या मोदकाचा साचा तयार करण्यासाठी ८ दिवस लागले. मंदिर परिसरात प्रदर्शनासाठी ठेवलेल्या मोदकासोबत सेल्फी काढण्यासाठी उपस्थितांनी गर्दी केली होती.
दिवाकर रावते या वेळी म्हणाले की, गेली तीन वर्षे सातत्याने असा ७५० किलोचा मोदक बाप्पाच्या चरणी अर्पण केला जात आहे. सर्व भक्त आपापल्या परीने विविध प्रकारचे प्रसाद बाप्पाच्या चरणी अर्पण करतात. आदेश बांदेकर म्हणाले की, दरवर्षी मी हा मोदक घेऊन श्रीसिद्धिविनायक मंदिरात येतो आणि हा मोदक मंदिर समितीकडे देतो. यंदा मी बाप्पाच्या कृपेने न्यासचा अध्यक्ष झालो असून, याचा मला आनंद होत आहे.

Web Title: Upgradation of 750 kg of Siddhivinayakacharya, attendees crowd to remove selfies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.