‘यूपीएससी’ची यापूर्वीची शिष्यवृती परीक्षा गोंधळामुळे रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 02:35 AM2019-04-14T02:35:12+5:302019-04-14T02:35:23+5:30

‘यूपीएससी’च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी दिल्लीमध्ये १७ मार्च झालेल्या ऑनलाईन परीक्षेत संगणकीय तांत्रिक गोंधळ झाला होता.

UPSC's earlier scholarship examination canceled due to confusion | ‘यूपीएससी’ची यापूर्वीची शिष्यवृती परीक्षा गोंधळामुळे रद्द

‘यूपीएससी’ची यापूर्वीची शिष्यवृती परीक्षा गोंधळामुळे रद्द

Next

- विश्वास खोड
मुंबई : ‘यूपीएससी’च्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी दिल्लीमध्ये १७ मार्च झालेल्या ऑनलाईन परीक्षेत संगणकीय तांत्रिक गोंधळ झाला होता. पुण्यातील ‘बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अ‍ॅन्ड टेÑनिंग इन्स्टिट्यूट’ने (बार्टी) ‘बार्टी’ दिल्ली-सीईटी-२०२० ही परीक्षा दिल्ली व महाराष्ट्रात घेतली होती. ‘लोकमत’ने दिल्लीतील परीक्षेतील गोंधळाचे वृत्त सर्वप्रथम प्रकाशित करुन विद्यार्थ्यांच्या समस्येला वाचा फोडली होती. त्यानंतर ‘बार्टी’ने संबंधित परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली आहे. ही परीक्षा आता ‘आॅफलाईन’(पेन-पेपर) पध्दतीने घेण्याचीही घोषणा केली आहे.
३ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या, मागासवर्गीय, ‘यूपीएससी’च्या अभ्यासकांना वर्षभरातून एकदा अभ्यासासाठी २ लाख रुपये वार्षिक आणि राहणे, भोजन आदीसाठी १२ हजार रुपये दरमहा दिले जातात. सामाजिक न्याय विभागातर्फे हे अनुदान दिले जाते.
दिल्लीच्या जनकपुरी येथील केंद्रात झालेल्या आॅनलाईन परीक्षेत २ तासांची परीक्षा ५ ते ६ तास घेतली गेली. ‘सवर््हर’मधील दोषामुळे अनेकांचे संगणक सुरुच झाले नाहीत. ज्यांचे सुरु झाले, त्यांच्या जागेवर नंतर अन्य परीक्षार्थींनीही नंतर परीक्षा दिली. त्यामुळे परीक्षेचा वेळ लांबला.
अनेकांनी प्रश्नांची उत्तरे ‘गूगल’वर शोधून लिहिली, अशी माहिती आकाश बांबोडे,उमेश कोर्राम आदी परीक्षार्थींनी सांगितली होती. या सर्व गोंधळाचे चित्रण ‘सीसीटिव्ही’मध्ये झाले. १९ मार्च रोजी परीक्षेचा निकालही जाहीर होऊन १ हजार जणांची यादी जाहीर झाली. ३२४१ जणांनी ही परीक्षा दिली होती. प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्रे होती.
पीडित विद्यार्थ्यांनी गुणवानांवर अन्याय झाल्याने परीक्षा रद्द करण्याची आणि ‘आॅफलाईन’ पध्दतीने पुन्हा घेण्याची मागणी केली होती. ‘लोकमत’ने महाराष्ट्र सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता ‘बार्टी’च्या महासंचालकांना चौकशी करण्याच्या सूचना केल्याचे त्यांनी नमूद केले होते.
>तांत्रिक कारणास्तव परीक्षा रद्द
महाराष्ट्र व दिल्ली येथील सर्व परीक्षा केंद्रांवर घेतलेली ‘बार्टी’दिल्ली-सीईटी-२०२० ही परीक्षा तांत्रिक कारणास्तव रद्द केल्याची घोषणा दरम्यान ‘बार्टी’ने १२ एप्रिल रोजी केली. ही परीक्षा केंद्र शासनाच्या संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या धर्तीवर आता आॅफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे, असे या घोषणापत्रामध्ये म्हटले असून परीक्षेची तारीख लवकरच ‘बार्टी’च्या संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल,असे नमूद केले आहे.

Web Title: UPSC's earlier scholarship examination canceled due to confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा