उडदाची डाळ महाग, पण आरोग्यासाठी स्वस्तच !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 10:46 AM2023-11-23T10:46:07+5:302023-11-23T10:46:48+5:30

आराेग्यासाठी खूपच उपयुक्त, तज्ज्ञांचे मत

Urad dal is expensive, but cheap for health! | उडदाची डाळ महाग, पण आरोग्यासाठी स्वस्तच !

उडदाची डाळ महाग, पण आरोग्यासाठी स्वस्तच !

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : डोसा असो की वडा अथवा मग सर्वाच्याच आवडीचे दहीवडे ते बनविण्यासाठी उडीद डाळीचा वापर हा होतोच. सध्या बाजारात अख्खा उडीद किंवा त्याची काळी डाळ ही १५२ रुपये किलो आहे. मात्र ती जरी महाग असली ती आरोग्यासाठी खूपच उपयोगी आहे. ती कशी ते आरोग्यतज्ज्ञ सांगतात.

जवळपास १०० ग्रॅम काळ्या उडीद डाळीत ३२४ कॅलरीज असतात. त्यात प्रथिन २३ ग्रॅम, कर्बोदक ५१ ग्रॅम, फॅटस- १.६ ग्रॅम, सोडियम १९ मिग्रॅ, पोटॅशियम ११०० मिग्रॅ, कॅल्शियम ५६ मिग्रॅ, लोह ४.५ मिग्रॅ, विटामिन बी ६-०.२ मिग्रॅ तर मॅग्नेशियम - १७३ मिग्रॅ असते. त्यामुळे काळे उडीद आरोग्यदायी असले तरी जास्त प्रमाणात सेवन केल्याने किडनी स्टोन, संधिरोग होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेतली पाहिजे.
- अदिती लोटणकर, आहारतज्ज्ञ

 हृदयरोगाचा धोकाही कमी 
उडद डाळीतील विरघळणारे फायबर घटक कोलेस्टेरॉल-बाइंडिंग एजंट म्हणून कार्य करते, तसेच प्रभावीपणे पचनमार्गातील एलडीएलला (खराब कोलेस्टेरॉल) अडकवते. ज्यामुळे एकूण कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊन हृदयरोगाचा धोका टाळताे.

 हाडेही होतात मजबूत... 
काळ्या उडीद डाळीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम इत्यादी आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. हे सर्व पोषक आपल्या हाडांमधील खनिज घनता वाढवण्यास मदत करतात. कारण वाढत्या वयासोबत आपली हाडे कमकुवत होऊन ऑस्टिओपोरोसिस सारख्या हाडांशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

 पचन सुधारते 
उडीद डाळ खाण्याचा सर्वात मोठा फायदा पचनक्रिया सुधारण्यास होतो. यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनसंस्थेचे कार्य उत्तम करण्यास ते मदत होते. परिणामी पोट नीट साफ होत मलामार्फत विषारी द्रव्ये बाहेर काढण्यासाठी पेरिस्टॅलिसिस (आकुंचन आणि ओटीपोटाचे स्नायू सोडणे) उत्तेजित करते.

 अँटिऑक्सिडंटमुळे कर्करोगास प्रतिबंध 
उडदाची डाळ फिनोलिक अॅसिड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिनसह अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे. ही संयुगे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यात मदत करते.

 

 

 

Web Title: Urad dal is expensive, but cheap for health!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.