शहरी नक्षलवाद : जामिनासाठी सुधा भारद्वाज यांची उच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 06:35 AM2019-02-07T06:35:29+5:302019-02-07T06:35:56+5:30

एल्गार परिषदेसंदर्भात अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सुधा भारद्वाज यांनी जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Urban Naxalism: Sudha Bhardwaj's bail in the High Court for bail | शहरी नक्षलवाद : जामिनासाठी सुधा भारद्वाज यांची उच्च न्यायालयात धाव

शहरी नक्षलवाद : जामिनासाठी सुधा भारद्वाज यांची उच्च न्यायालयात धाव

Next

 मुंबई : एल्गार परिषदेसंदर्भात अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सुधा भारद्वाज यांनी जामीन मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील सुनावणी १८ फेब्रुवारी रोजी ठेवली आहे.
आॅक्टोबर, २०१८मध्ये पुणे सत्र न्यायालयाने भारद्वाज यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्याला भारद्वाज यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले.
पुणे पोलिसांनी पुरावे म्हणून सादर केलेल्या चार पत्रांचा आधार घेत, न्यायालयाने भारद्वाज यांचा जामीन अर्ज फेटाळला. मात्र, ते पुरावे भारतीय पुरावे कायद्यांतर्गत मान्य करून घेण्याजोगे नाहीत, असा युक्तिवाद भारद्वाज यांचे वकील युग चौधरी यांनी केला.
आॅगस्ट, २०१८मध्ये पुणे पोलिसांनी अटक केलेल्या १० कार्यकर्त्यांमध्ये भारद्वाज यांचा समावेश आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारामागे या सर्वांचा हात असल्याचा पोलिसांचा दावा आहे, तसेच बंदी घातलेल्या सीपीआयशी संबंध असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Web Title: Urban Naxalism: Sudha Bhardwaj's bail in the High Court for bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.