'आभार मानावे तेवढे कमीच...'; रुपाली चाकणकरांच्या आदेशानंतर उर्फी जावेदचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 12:45 PM2023-01-18T12:45:34+5:302023-01-18T12:47:36+5:30

रुपाली चाकणकर आणि महिला आयोगाने घेतलेल्या भूमिकेवर उर्फी जावेद हिने प्रतिक्रिया दिली आहे.

Urfi Javed has reacted to the stand taken by Rupali Chakankar and the Commission for Women. | 'आभार मानावे तेवढे कमीच...'; रुपाली चाकणकरांच्या आदेशानंतर उर्फी जावेदचं ट्विट

'आभार मानावे तेवढे कमीच...'; रुपाली चाकणकरांच्या आदेशानंतर उर्फी जावेदचं ट्विट

Next

मुंबई- सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद हिने माझ्यावर हल्ला होऊ शकतो अशी भीती व्यक्त करत राज्य महिला आयोगाला अर्ज केला होता. आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अर्जाची दखल घेत मुंबई पोलिसांना कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत रुपाली चाकणकर यांनी स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली होती.

उर्फी जावेदच्या तक्रारीची दखल घेत रुपाली चाकणकर यांनी मुंबई पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 'मुक्त संचाराचा हक्क घटनेने प्रत्येक भारतीयाला दिला आहे, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे.त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी यावर तात्काळ कारवाई करावी व केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करावा.' असे ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले होते.

रुपाली चाकणकरांच्या या आदेशावर आता उर्फी जावेदनेही ट्विट करत भाष्य केलं आहे. जे योग्य आहे त्यासाठी उभे राहिल्याबद्दल आभार मानावे तेवढे कमीच आहेत. तुम्हाला माझे कपडे आवडत नसले, तरी तुम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही आणि मला मारण्याची किंवा हिंसाचार भडकावण्याची सार्वजनिकपणे धमकी देऊ शकत नाही, असं उर्फीने म्हटलं आहे.

दरम्यान, उर्फीच्या कपड्यांवर वारंवार आक्षेप घेणाऱ्या चित्रा वाघ यांनी तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. मला धमक्या देण्याची गरज नाही. मी फक्त इशारा दिला असल्याचे याप्रकरणी प्रतिक्रिया देताना चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. अशी उघडी नागडी फिरू नको एवढेच माझे म्हणणे असून, असे म्हणणे धमकी आहे का?, असे चित्रा वाघ यांनी स्पष्ट केले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Urfi Javed has reacted to the stand taken by Rupali Chakankar and the Commission for Women.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.