शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर उर्मिला मातोंडकर यांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2020 05:50 PM2020-11-30T17:50:02+5:302020-11-30T18:29:31+5:30

Urmila Matondkar News : प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त गेल्या एक दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

Urmila Matondkar denied the news that she will join Shiv Sena | शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर उर्मिला मातोंडकर यांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाल्या...

शिवसेना प्रवेशाच्या चर्चेवर उर्मिला मातोंडकर यांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाल्या...

Next
ठळक मुद्देउर्मिला मातोंंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळले उर्मिला मातोंडकर यांनीही हा प्रस्ताव स्वीकारल्याचे सांगण्यात येत होतेराज्यपाल नियुक्त सदस्यासाठी उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर त्यांच्या शिवसेना प्रवेशाची सुरू झाली होती चर्चा

मुंबई - प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त गेल्या एक दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. दरम्यान, उर्मिला मातोंंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळून लावल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस केली होती.

शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा ऊर्मिला मातोंडकर यांच्याकडून इन्कार करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, उर्मिला मातोंडकर यांनी उद्या संध्याकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले. तुम्ही सर्वजण देत असलेल्या पाठिंब्याबाबत आभार. मी उद्या संध्याकाळी चार वाजता प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे. कृपया कोरोनाचे नियम पाळून उपस्थित राहा, जय महाराष्ट्र, असे ट्विट उर्मिला मातोंडकर यांनी केले आहे. , उर्मिला मातोंडकर ह्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताला शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी दुजोरा दिला होता.

उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूकही लढवली होती. त्यावेळी भाजपाच्या गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्या काही काळ राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर होत्या. तसेच त्या काँग्रेसमध्ये नाराज असल्याचेही सांगण्यात येत होते.

दरम्यान, विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा विषय समोर आल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांचे नाव चर्चेत आले होते. राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी शिवसेनेने उर्मिला मातोंडकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे तसेच उर्मिला मातोंडकर यांनीही हा प्रस्ताव स्वीकारल्याचे सांगण्यात येत होते.

राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या पदांसाठी १२ जणांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली आहे. यामध्ये शिवसेनेने उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे-पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसने रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वणकर यांना संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रसने एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे यांना संधी दिली आहे.

Web Title: Urmila Matondkar denied the news that she will join Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.