Join us

ऊर्मिला मातोंडकर यांचे ‘इन्स्टाग्राम’ हॅक; सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 06:45 IST

पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांची भेट घेताच त्यांच्याकडून या गुन्ह्यासंबंधी बरीच माहिती मिळाल्याचे सांगत, भविष्यात यावर काम करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुंबई : अभिनेत्री व शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. या प्रकरणी त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ‘माझे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे. सुरुवातीला ते थेट मेसेज करताना काही स्टेप्स फॉलो करायला सांगतात, नंतर अकाउंट व्हेरिफाय करतात व मग ते हॅक होते. त्यामुळे सायबर क्राइमला सहजपणे घेऊ नये,’ असे ट्विट ऊर्मिला यांनी केले. पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांची भेट घेताच त्यांच्याकडून या गुन्ह्यासंबंधी बरीच माहिती मिळाल्याचे सांगत, भविष्यात यावर काम करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

टॅग्स :उर्मिला मातोंडकर