Join us

अमेरिकेच्या राजदूतांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट;तांत्रिक सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 12:19 PM

भारत-अमेरिका दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, संपर्क क्षेत्रात वाणिज्यिक संबंध आहेत.

मुंबई: अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गारसेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. महाराष्ट्रात कृषी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रात मोठी असून अमेरिकेने या क्षेत्रात सहकार्य करावे. अमेरिकेसोबत महाराष्ट्राचे वाणिज्यिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.

भारत-अमेरिका दोन्ही देशांमध्ये व्यापार, गुंतवणूक, संपर्क क्षेत्रात वाणिज्यिक संबंध आहेत. थेट परकीय गुंतवणूकीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर असून राज्यातील कृषी, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणुकीची संधी असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले. बदलते हवामान हे शेती क्षेत्रासमोर मोठे आवाहन असून त्यासाठी अमेरिकेने तांत्रिक सहकार्य करण्याचे आवाहन देखील एकनाथ शिंदेंनी यावेळी केले. 

मुंबईत सुरू असलेले विविध प्रकल्प, महिला सक्षमीकरण, बचत गटांची चळवळ आदींबाबत चर्चा झाली. शिष्टमंडळासाठी अल्पोपहारामध्ये महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश होता. गारसेट्टी खवय्ये असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमेरिकन राजदूत यांना वडापाव खाण्याचा आग्रह केला. हा आग्रह स्वीकारत गारसेट्टी यांनी वडापाव खाल्ला आणि आवडल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले. 

टॅग्स :एकनाथ शिंदेअमेरिकाभारतमहाराष्ट्र