मुंबई : गणेशोत्सव विसर्जन मिरवणूकीवेळी मुंबई पोलीस दलाकडून वापरण्यात आलेल्या ‘अॅण्टी ड्रोन’चा वापर आगामी नवरात्रोत्सव आणि विधानसभा निवडणूकीत अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या प्रचार सभामध्ये केला जाणार आहे.मुंबई आयुक्त संजय बर्वे यांनी शनिवारी त्याबाबत माहिती दिली. घातपातासाठी समाजकंटकांकडून ड्रोनद्वारे वापर होत असल्यास त्याला तात्काळ ‘अॅण्टी ड्रोन’द्वारे प्रतिबंध घालता येणार असल्याचे त्यांची स्पष्ट केले.
अतिरेकी संघटनाकडून भविष्यात ड्रोनद्वारे विशिष्ट संस्था, व्यक्तीवर हल्ला घडविण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याला लगाम घालण्यास मुंबई पोलीस दल सक्षम असल्याचे आयुक्तांनी सांगितले. महानगरात गणेशोत्सव व मोहरम सुरळीतपणे पार पडले, त्याबाबत पोलिसांच्या आवाहानाला प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांचे आभार मानून आयुक्त बर्वे म्हणाले,‘ विसर्जन मिरवणूकीवेळी अतिरेकी संघटनांकडून घातपाती कृत्य होण्याच्या शक्यतेने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामध्ये समाजकटकांकडून ड्रोनद्वारे हल्ला होण्याची शक्यता असल्याचे आम्ही‘अॅण्टी ड्रोन’चा वापर केला होता. त्याच्यामुळे कोणी व्यक्तीगत रित्या ड्रोनचा वापर केला जात असल्यास त्याबाबत तातडीने लक्षात येवून त्यावर अवघ्या काही सेंकदात त्याला निकामी करता येते. आगामी नवरात्रोत्सव व विधान सभा निवडणूकीत महत्वाच्या प्रचारसभावेळी त्याचा वापर खबरदारी घेण्यासाठी घेतला जाणार आहे.
नवरात्रोत्सवात महिलांच्या सुरक्षेबाबत विशेष खबरदारीनवरात्रोत्वाला आता काही दिवसाचा अवधी उरला असल्याने त्याबाबत बंदोबस्ताचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. या कालावधीत महिला,तरुणीच्या छेडछाड, विनयभंगाच्या घटना होण्याच्या शक्यता असल्याने त्यासाठी विशेष खबरदारी घेतली असून गैरकृत्य करणाºयावर तात्काळ कारवाई केली जाईल, नवरात्रोत्सव मंडळ, आयोजकांना त्याबाबत योग्य सूचना देण्यात आल्या असल्याचे आयुक्त यांनी स्पष्ट केले.विसर्जन मिरवणूकीवर ड्रोनद्वारचे नियंत्रण अनंत चतूर्थीला बंदोबस्त व वाहतुक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांनी सहा ड्रोनचा वापर केला होता. त्यातील दोन ड्रोनचे नियंत्रण थेट पोलीस नियंत्रण कक्षातून केले जात होते. त्याच्या वापरामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणे, वाहतुक योग्य दिशेला वळविणे तसेच गैरकृत्य करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी ते उपयुक्त ठरले. पोलीस दलाने सहा ड्रोन नुकतेच खरेदी केले असून त्याचा वापर यापुढे प्रत्येक महत्वाच्या प्रसंगात केला जाईल, असे संजय बर्वे यांनी सांगितले.