वसई : वसई-विरार परिसरातील अनेक हॉटेल्स तसेच चायनीज पदार्थ विकणारे व्यावसायिक घरगुती गॅस सिलिंडर्सचा सर्रास वापर करीत आहेत. कमर्शियल सिलिंडर्स परवडत नसल्यामुळे गॅस एजन्सीच्या डिलिव्हरी मुलांना हाताशी धरून सदर गैरप्रकार होत असतात. काल पुरवठा विभागाच्या अधिका:यानी नालासोपारा पूर्व भागातील हॉटेल कृतिकावर धाड टाकून 5 घरगुती सिलिंडर्स व अन्य साहित्य जप्त केले. याप्रकरणी हॉटेल मालक व व्यवस्थापकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर गॅस एजन्सीलाही नोटीस बजावण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाच्या अधिका:यांनी सांगितले.
वसई-विरार परिसरात नागरिकांना घरगुती गॅस सिलिंडर्स मिळवताना तारेवरची कसरत करावी लागते, परंतु हॉटेल व्यावसायिक व खाद्यपदार्थाची विक्री करणा:या गाडय़ांना हे सिलिंडर्स विनासायास मिळू शकतात. त्यासाठी या व्यावसायिकांना दुपटीपेक्षा अधिक पदरमोड करावी लागते. कमर्शियल गॅस सिलेंडर 17क्क् ते 18क्क् रूपये दरम्यान मिळतो तर डिलिव्हरी करणारी मुले आपल्याकडे असलेले घरगुती सिलेंडर्स 1क्क्क् ते 12क्क् रूपयाला विकतात. यामध्ये एजन्सी मालक व कर्मचा:यांचे उखळ चांगलेच पांढरे होत असते. परंतु या सर्व गैरप्रकारामुळे सर्वसामान्य ग्राहक मात्र भरडला जातो. त्याला आपल्या हक्काच्या गॅस सिलिंडरसाठी 2क् ते 25 दिवस प्रतीक्षा करावी लागते.
याप्रकरणी अनेक तक्रारी आल्यानंतर पुरवठा अधिकारी सुरेश भोईर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नालासोपारा पूर्व भागातील हॉटेल कृतिकावर धाड टाकून 5 घरगुती सिलेंडर्स जप्त केले व हॉटेल मालक सुरेश महाबल पुजारी व व्यवस्थापक संतोष पुजारी या दोघांना अटक केली. नालासोपारा पोलिस ठाण्यात या दोघांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी ज्या गॅस एजन्सीकडून हे सिलिंडर्स देण्यात आले त्या एजन्सीला नोटीस देण्यात येणार असल्याचे सूत्रंनी सांगितले. (वार्ताहर)