विज्ञान समृद्धीसाठी वापरा!
By Admin | Published: January 11, 2016 02:20 AM2016-01-11T02:20:04+5:302016-01-11T02:20:04+5:30
मुंबई विद्यापीठात दरवर्षी १ हजारपैकी सुमारे १५ शोध प्रकल्प हे समाजोपयोगी असतात. मात्र, सध्या बदलते हवामान, प्रदूषणात होणारी वाढ,
मुंबई: मुंबई विद्यापीठात दरवर्षी १ हजारपैकी सुमारे १५ शोध प्रकल्प हे समाजोपयोगी असतात. मात्र, सध्या बदलते हवामान, प्रदूषणात होणारी वाढ, पाणी-वीजटंचाई, प्रदूषण आदी विविध समस्यांना देशातील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे विज्ञानाचा उपयोग हा उद्योग, व्यापार, दळणवळणासाठी आणि समाजाच्या समृद्धीसाठी करा, असे आवाहन नागालँड आणि आसामचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी वर्सोव्यात केले. तीन दिवसीय पश्चिम विभागीय विज्ञान प्रदर्शनाची सांगता वर्सोवा येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते.
शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम विभाग, माध्यमिक व उच्च माध्यमिक पश्चिम विभाग आणि चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूलने हे प्रदर्शन वर्सोवा येथील चिल्ड्रन वेल्फेअर शाळेत भरवले होते. त्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
वांद्रे ते दहिसर येथील तब्बल ९२ शाळांमधील ६५० विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवला. प्रदर्शनच्या कालावधीत सुमारे १० हजार विद्यार्थ्यांनी येथे भेट दिली.
बाल वैज्ञानिकांना प्रोत्साहान देण्यासाठी, समावेशित विकासासाठी विज्ञान व गणित हा यंदाच्या विज्ञान प्रदर्शनाचा विषय होता. या प्रदर्शनाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल पद्मनाभ आचार्य यांनी चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूलचे मुख्याध्यापक अजय कौल, प्रशांत काशिद आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी, बृहन्मुंबई पश्चिम विभाग शिक्षण निरीक्षक नितीन बच्छाव यांचे कौतुक केले. यावेळी मंचावर शिवसंग्रामचे अध्यक्ष व आमदार विनायक मेटे, वर्सोव्याच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर, चारकोपचे आमदार योगेश सागर, पश्चिम विभाग शिक्षण निरीक्षक नितीन बच्छाव, मुख्याध्यापक अजय कौल उपस्थित होते. (प्रतिनिधी)पुरस्कार विजेत्या शाळा
आयोजनाबद्धल आर (पूर्व) येथील सेंट लॉरेन्स शाळा आणि पी वॉर्ड येथील सर्वपल्ली राधाकृष्णन शाळा यांना विभागून पाहिले पारितोषिक, दुसरे पारितोषिक के(पश्चिम)वॉर्ड मधील सेंट मेरी शाळा, तर तिसरे पारितोषिक कमलादेवी जैन शाळा यांना देण्यात आले. विविध विज्ञान प्रकल्पांबद्धल विविध परितोषिकांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रदर्शनाला प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री झिनत अमान यांनीही भेट दिली.