Join us

... त्या जीएसटी भवनचा वापर उद्यापासून सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 5:37 AM

आयुक्तांकडून पाहणी, पंचनाम्यासह आगीमुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

मुंबई : राज्य कर आयुक्त कार्यालयाच्या (जीएसटी) इमारतीला सोमवारी लागलेल्या भीषण आगीनंतर दुसऱ्या दिवशी इमारतीमध्ये कुलिंग आॅपरेशनचे काम सुरू होते. राज्य कर आयुक्त संजीव कुमार व इतर अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली व नुकसानीचा अंदाज घेतला. त्यानंतर दिवसभर हे अधिकारी बैठकीत व्यस्त होते. या आगीमध्ये इमारतीच्या नवव्या, दहाव्या मजल्यांचे नुकसान झाल्याने व आठव्या मजल्याला आगीची झळ बसल्याने या मजल्यांच्या नूतनीकरणाचे काम करावे लागणार आहे. मंगळवारी दिवसभर पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करण्यातच प्रशासन गुंतलेले होते. या इमारतीचा वापर गुरुवारपासून सुरू होईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

माझगाव येथील राज्य कर आयुक्त कार्यालयाच्या इमारतीच्या मुख्य भागातील नवव्या मजल्याला सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. नवव्यासह, दहाव्या मजल्याचेही आगीत नुकसान झाल्याने सावधगिरी म्हणून इमारतीचा वीजपुरवठा तसेच इतर सुविधा खंडित करण्यात आल्या आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही. आगीची प्राथमिक चौकशी सुरू आहे. सर्व काम पूर्ण करून गुरुवारपासून पूर्वीप्रमाणे कर्मचाºयांना काम करण्यास प्रारंभ होईल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी अभिजित घवले यांनी दिली.जीएसटी इमारतीतील काही विभाग माझगाव येथील एमटीएनएलच्या इमारतीत यापूर्वीच स्थलांतरित करण्यात आले आहेत. जीएसटी भवनच्या इमारतीची दुरुस्ती सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आगीनंतर मंगळवारी एमटीएनएल इमारतीतील कर्मचारी, अधिकाºयांनी नेहमीप्रमाणे काम केले, तर उर्वरित कर्मचाºयांना शक्य असल्यास बाहेरून काम करण्याची मुभा देण्यात आलीहोती. जीएसटी भवन इमारतीच्या डागडुजीनंतर इतर कर्मचारी गुरुवारपासून कामावर रुजू होतील, असे घवले यांनी सांगितले.आगीमध्ये फक्त नवव्या मजल्याचे नुकसानसोमवारी लागलेल्या आगीमध्ये केवळ नवव्या मजल्याचे नुकसान झाले असून दहाव्या मजल्याचे काहीही नुकसान झालेले नाही. दहावा मजला बाहेरून काळा झाला असला तरी आतून त्याचे काहीही नुकसान झालेले नाही, असा दावा माहिती जनसंपर्क अधिकारी अभिजित घवले यांनी केला. 

टॅग्स :मुख्य जीएसटी कार्यालयमुंबईआग