मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल.
सार्वजनिक कार्यक्रम, सभा, विवाह समारंभ, आदींमध्ये उपस्थितांची संख्या मर्यादित ठेवतानाच मास्क वापरणे बंधनकारक आहे.
जे नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
------------------
कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांवर २०० रुपये एवढ्या दंडाची आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह इत्यादींमध्ये देखील धडक कारवाई करण्यात येऊन कोविड विषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
------------------
मुंबई महापालिकेने मास्क घालणार नाहीत, अशांवर कारवाई करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे.
सार्वजनिक परिसरात मुंबई महापालिकेने कारवाई करण्यासाठी क्लीन-अप मार्शलची नेमणूक केली आहे.
जे नागरिक मास्क घालत नाहीत, अशा नागरिकांवर मार्शल कारवाई करीत त्यांना मास्क घालण्याची विनंती करीत आहे.
------------------