अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी ‘त्या’ स्कार्पिओचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:07 AM2021-03-14T04:07:07+5:302021-03-14T04:07:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या साहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडील चौकशीतून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या साहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्याकडील चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. हिरेन यांच्या महिंद्रा स्कॉर्पिओचा वापर सुमारे चार महिन्यांपूर्वी अर्णब गोस्वामीच्या अटकेवेळी करण्यात आला होता.
२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेली मिळालेली कार ही त्या वेळी वाझे यांच्याकडे होती. याच गाडीतून अर्णब गोस्वामी याच्या घरी ते गेले होते. मात्र त्या वेळी या स्कॉर्पिओला अन्य नंबर प्लेट लावण्यात आली होती, असे सूत्रांकडून सांगण्यात येते. अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात गेल्या वर्षी ४ नोव्हेंबरला गोस्वामीला त्याच्या परळ येथील घरी जाऊन अटक केली होती. त्या पथकाचे नेतृत्व वाझे यांनी केले होते.