मुंबई : तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच सोशल मीडियाचा वापर करून ग्रंथालयांनी अधिकाधिक लोकाभिमुख व्हावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी केले.ग्रंथालय संचालनालयाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ तसेच ‘डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार’ वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री तावडे बोलत होते. या वेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे उपसचिव पा. म. ताकटे, ग्रंथालय संचालक किरण धांडोरे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार आदी उपस्थित होते. विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात हा सोहळा झाला. ग्रंथालय संचालनालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण तसेच राष्ट्रीय ग्रंथसूचीचे प्रकाशन तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कारप्राप्त ग्रंथालयांच्या वतीने शिव शर्मा तर पुरस्कारप्राप्त कार्यकर्त्यांच्या वतीने रमेश सुतार यांनी मनोगत व्यक्त केले. (विशेष प्रतिनिधी)२०१४ साठीचे पुरस्कार ग्रामीण विभागासाठी : श्री शिवाजी सार्वजनिक वाचनालय, मांगले, जि. सांगली; विकास वाचनालय, लोणी, जि. पुणे; श्री छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय, शिवपूर, जि. लातूर; दिवंगत लक्ष्मणराव श्यामराव मुंडे सार्वजनिक वाचनालय, टोकवाडी, जि. बीड.डॉ. एस. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार - राज्यस्तर : कार्यकर्ता राम हनमंतराव देशपांडे, अमरावती; सेवक - आत्माराम बाबूराव कांबळे, लातूर; विभागस्तर : कार्यकर्ता - अरुणा सदाशिव कुल्ली, बुलडाणा; देवीदास भगवानराव देशपांडे, औरंगाबाद; डॉ. श्रावण किसनजी उके, गोंदिया; सतीश उत्तमराव पाटील, धुळे; रमेश धोंडिबा सुतार, पुणे; नागेश मधुकर कुलकर्णी, अलिबाग (रायगड)सेवक : प्रमोद वानखडे, औरंगाबाद - सूर्यकांत शिरसे, लातूर; निरंजन शिवणकर, भंडारा; राजेश शिरसाट, नाशिक; पुणे - विठ्ठल क्षीरसागर, पुणे; भालचंद्र वर्तक, अलिबाग
ग्रंथालयांमध्ये व्हावा सोशल मीडियाचा वापर
By admin | Published: May 22, 2016 3:26 AM