अमलीपदार्थ पुरविण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 02:49 AM2018-10-03T02:49:43+5:302018-10-03T02:50:33+5:30
खार पोलिसांकडून एकाला अटक : साडे तीन लाखांचे कोकेन जप्त
मुंबई : अमलीपदार्थ पुरविण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांचा वापर करणाऱ्या फैजल शफिक शेख (२९) याला खार पोलिसांनी रविवारी अटक केली. त्याच्याकडून साडे तीन लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.
तीन दिवसांपूर्वी अमलीपदार्थविरोधी पथकाच्या वांद्रे येथील कक्षाने साबीर खान (३२) याला एमडी या अमलीपदार्थासह अटक केली होती. त्याच्याकडील चौकशीतून शहर आणि उपनगरात अमलीपदार्थ विक्री करणाºया २० तस्करांची नावे मिळाली असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. विशेष म्हणजे शाळकरी मुलांचा वापर ते महाविद्यालयीन मुलांना अमलीपदार्थ पुरविण्यासाठी करतात, अशीही माहिती तपास अधिकाºयांना मिळाली आहे.
खान याने दिलेल्या कबुलीनंतर खार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाले आणि त्यांच्या पथकाने मदर तेरेसा बीएमसी मैदानाजवळ सापळा रचून फैजल शफिक शेख याला अटक केली. अंगझडती घेतली तेव्हा त्याच्याकडे ६८ ग्रॅम कोकेन त्यांना सापडले.