पाणी वापरा जपून; प्रमुख तलाव न भरल्याने मुंबईकरांना पालिकेची विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 11:56 AM2023-08-20T11:56:42+5:302023-08-20T11:57:14+5:30

पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून करण्यात आले आहे

Use water sparingly; Municipality request to Mumbaikars due to non-filling of major lakes | पाणी वापरा जपून; प्रमुख तलाव न भरल्याने मुंबईकरांना पालिकेची विनंती

पाणी वापरा जपून; प्रमुख तलाव न भरल्याने मुंबईकरांना पालिकेची विनंती

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ऑगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. तशात तलाव क्षेत्रातही पाऊस पडला नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा ८३ टक्क्यांवर स्थिरावला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी कोणताही प्रमुख तलाव सध्या ओव्हरफ्लो नाही. तसेच जुलै महिन्याच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने मुंबईची पाण्याची चिंता मिटली, असे म्हणता येणार नसल्याने मुंबईकरांचे पाण्याचे टेन्शन अजून काही दिवस कायम आहे. त्यामुळेच पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून करण्यात आले आहे.

आतापर्यंत मुंबईत वार्षिक सरासरीच्या ७३ टक्के पाऊस पडला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी विहार तलाव १०० टक्के व तुळशी तलाव ९९ टक्के भरलेला आहे. मात्र, पाणीपुरवठ्याचा विचार करता विहार व तुळशी तलावांमधील जलसाठा हा अत्यल्प आहे. शिवाय, सर्वांत मोठे तलाव असणाऱ्या अप्पर वैतरणा तलावातील जलसाठा ७१.०९ टक्के आहे. तर भातसा तलावातील जलसाठा ७८.१६ टक्के आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व सातही तलावांमध्ये एकंदरीत जलसाठा हा ८३.५१ टक्के इतका आहे. 

ऑक्टोबरमधील जलसाठ्यावर नियोजन

  • दरवर्षी १ ऑक्टोबर ही तारीख पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची तारीख असून, या दिवशी सर्व तलावांमधील जलसाठा १०० टक्के असल्यास पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने सदर बाब ही समाधानकारक मानण्यात येते. 
  • त्यामुळे यावर्षी ऑक्टोबर महिन्यातील जलसाठा किती त्यावर पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन अवलंबून असेल, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

Web Title: Use water sparingly; Municipality request to Mumbaikars due to non-filling of major lakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.