पाणी जपून वापरा, फेब्रुवारीतच धरणांनी गाठला तळ... मेमध्ये काय होईल ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 06:05 AM2024-02-20T06:05:26+5:302024-02-20T06:05:36+5:30
राज्यातील बहुतांशी धरणांनी तळ गाठला असून, गतवर्षीच्या तुलनेत सरासरी २१.६१ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे.
बाळासाहेब बोचरे
मुंबई : राज्यातील बहुतांशी धरणांनी तळ गाठला असून, गतवर्षीच्या तुलनेत सरासरी २१.६१ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील १२ प्रकल्प सध्या मायनसमध्ये असून, १५ धरणांमध्ये जेमतेम दहा टक्क्यांच्या आसपास साठा आहे. मराठवाड्याची परिस्थिती चिंताजनक आहे. मराठवाड्यात फक्त २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गतवर्षी तो ७२ टक्के होता.
राज्यातील १३८ प्रमुख धरणांत गतवर्षी ७४.३४ टक्के साठा होता, तो सध्या ५०.३७ टक्क्यांंवर आला आहे.
२६०
मध्यम प्रकल्पांत गतवर्षी ६७.६८ टक्के साठा होता,
तो यंदा ५३.०३ टक्क्यांवर आला आहे.
२,५९६
लघु प्रकल्पांत गतवर्षी आज रोजी एकूण पाणीसाठा ५५.६४ टक्के होता, तो ३९.१५ टक्क्यांवर आला आहे.
२,९९४
प्रकल्पांत गतवर्षी ७०.७० टक्के असलेला साठा यंदा ४९.०९ टक्क्यांवर आला असून, तो २१.६१ टक्के कमी आहे.
१२ धरणे मायनसमध्ये
राज्यातील कलीसरार (गोंदिया), खडकपूर्णा (बुलढाणा), बोरगाव अंजनपूर व सिरसमार्ग (बीड), मंगरुळ किनवट (नांदेड), किल्लारी, मदनसुरी, सीना कोळेगाव, राजेगाव (धाराशिव), शिवणी (लातूर), लोणावळा टाटा (पुणे) आणि उजनी (सोलापूर).
१५ धरणे जेमतेम
लोअर दुधना (लातूर) १३.४०%
टाकळगाव देवळा (लातूर) ४.९२%
बिंदगीहाळ (लातूर) १७.७८%
साई (लातूर) १५.५६%
तगरखेडा (धाराशिव) १२.९९%
लोअर तेरणा (धाराशिव) ८.२१%
लिंबाळा (धाराशिव) ६.९०%
गुंजरगा (धाराशिव) ८.०३%
मंगरूळ (नांदेड) १५.६४%
हिरडपुरी (नांदेड) २.७९%
रोशनपुरी (बीड) १२.८६%