मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या माध्यमातून ऊर्जानिर्मितीचा प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 03:33 AM2018-08-12T03:33:04+5:302018-08-12T03:33:22+5:30
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या माध्यमातून ऊर्जानिर्मितीचा प्रयोग महापालिका करीत आहे. भांडुप, तानसा आणि पिसे पांजरापूर येथे हे प्रयोग सुरू आहेत.
मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या माध्यमातून ऊर्जानिर्मितीचा प्रयोग महापालिका करीत आहे. भांडुप, तानसा आणि पिसे पांजरापूर येथे हे प्रयोग सुरू आहेत. त्यानुसार भांडुप येथून २.५ मेगावॅट, पांजरापूरमधून अडीचशे किलोवॅट आणि तानसा येथे ४० किलोवॅट वीजनिर्मितीचे लक्ष्य आहे. याबाबतचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी महापालिकेत मंजूर झाल्यानंतर आता त्यावर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
मुंबईला दररोज वैतरणा, तानसा, मोडकसागर, मध्य वैतरणा, भातसा या प्रमुख धरणांतून पाणीपुरवठा होत असतो. तानसा येथे हायड्रॉ टर्बाइनद्वारे ४० किलोवॅट वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. तर पिसे पांजरापूरमध्येही अडीचशे किलोवॅट ऊर्जा प्रकल्प तयार केला आहे.
भांडुप येथे दोन टप्प्यांमध्ये २० मेगावॅट वीजनिर्मितीचे महापालिकेचे लक्ष्य आहे. मात्र सध्या केवळ २.५ मेगावॅट वीजनिर्मितीसाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील या प्रयोगावर दोन ते तीन महिने काम केल्यानंतर दुसºया टप्प्याचे काम सुरू करण्यात येईल.
दरम्यान, पिसे-पांजरापूर येथे जलशुद्धीकरण केंद्रावर ०.४५ मेगावॅटचा प्रकल्प सुरू करण्यात आल्याचे एका अधिकाºयाने सांगितले.
वाया जाणाºया पाण्याचा वापर
धरणातून उचललेल्या पाण्याचे वितरण करण्याआधी भांडुप व पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रात त्यावर प्रक्रिया केली जाते. तर उर्वरित ठिकाणी पाणी वाया जाते. या वाया जाणाºया पाण्याद्वारे पालिकेने वीजनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.
0.45 पिसे-पांजरापूर येथे जलशुद्धीकरण केंद्रावर प्रकल्प सुरू
मुंबई शहराला धरणातून दररोज ३८३५ दशलक्ष पाणी पुरविण्यात येते.
या प्रकल्पातून निर्माण होत असलेल्या विजेचा वापर विद्युत दिव्यांसाठी आणि संयंत्रांसाठी करण्यात येणार आहे.
विद्युत प्रकल्प निर्मितीमुळे विजेच्या खर्चाची बचत होत आहे.