प्रदूषणमुक्त मुंबईसाठी सायकल मार्गिका उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 06:44 AM2017-12-04T06:44:12+5:302017-12-04T06:44:43+5:30

मुंबईकर नागरिकांच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक तंदुरुस्तीसाठी व प्रदूषणमुक्त मुंबईसाठी, मुंबई महापालिकेने सायकलसाठी सुरू केलेली स्वतंत्र मार्गिका अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन महापौर

Useful for Cycle Route for Pollution-free Mumbai | प्रदूषणमुक्त मुंबईसाठी सायकल मार्गिका उपयुक्त

प्रदूषणमुक्त मुंबईसाठी सायकल मार्गिका उपयुक्त

Next

मुंबई : मुंबईकर नागरिकांच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक तंदुरुस्तीसाठी व प्रदूषणमुक्त मुंबईसाठी, मुंबई महापालिकेने सायकलसाठी सुरू केलेली स्वतंत्र मार्गिका अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. महापालिकेच्या वतीने फक्त रविवारी सायकलसाठी एअर इंडिया मुख्यालय (मरिन ड्राइव्ह) ते वरळी सी फेस ही ११.५ किलोमीटरची स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली आहे. निमंत्रितांसाठी प्रथम टप्प्यामध्ये एअर इंडिया मुख्यालय (मरिन ड्राइव्ह ) ते गिरगाव चौपाटी या पाच किमी. रस्त्यावर सायकलसाठी स्वतंत्र मार्गिकेचा शुभारंभ रविवारी सकाळी विश्वनाथ महाडेश्वर यांच्या उपस्थितीत करण्यात आला, या वेळी ते बोलत होते.
विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की, मुंबईकर नागरिकांचा प्रतिसाद बघून, पुढील काळात ही मार्गिका नियमित करायची का, हे निश्चित करण्यात येईल, तर आयुक्त अजय मेहता म्हणाले की, मुंबईकर नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद उत्तम असून, यापुढील काळात पूर्व व पश्चिम उपनगरात लवकरच सायकलसाठी स्वतंत्र मार्गिका सुरू करू. तसेच यामध्ये आणखी काही सुधारणा करता येईल का, याचा विचार केला जाईल.
मुंबई पोलीस आयुक्त दतात्रय पडसलगीकर म्हणाले की, सायकलसाठी तयार केलेल्या स्वतंत्र मार्गिकेच्या सुरक्षिततेसाठी, पालिकेला सहकार्य करण्यासोबत वाहतुकीची शिस्त सांभाळण्यावर भर दिला जाईल.

Web Title: Useful for Cycle Route for Pollution-free Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.