‘एमपीएससी’ची रिक्त पदे गेली दोन लाखांवर; मेगाभरती करायची की नाही, आयाेग त्रस्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 06:08 AM2023-11-11T06:08:57+5:302023-11-11T07:05:40+5:30

‘एमपीएससी’कडून सुरू असलेली पदभरती आठ महिन्यांत पूर्ण होईल. मात्र, ‘गेल्या तीन वर्षांत निवृत्तीमुळे ६० हजारांच्या आसपास पदे रिक्त झाली आहेत.

Vacancies of 'MPSC' crossed two lakhs; Whether to do mega recruitment or not, Aayeg is in trouble | ‘एमपीएससी’ची रिक्त पदे गेली दोन लाखांवर; मेगाभरती करायची की नाही, आयाेग त्रस्त 

‘एमपीएससी’ची रिक्त पदे गेली दोन लाखांवर; मेगाभरती करायची की नाही, आयाेग त्रस्त 

- रेश्मा शिवडेकर 

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २१ हजार पदांची मेगाभरती आठ महिन्यांत पूर्ण होणार असली तरी एकाच वेळेस एवढी पदभरती झाली तर स्पर्धात्मकता व पदोन्नतीचे प्रश्न भविष्यात उभे ठाकतील, असे म्हणत ‘महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघा’चे अध्यक्ष विनोद देसाई यांनी वेगळा सूर लावला आहे.

‘एमपीएससी’कडून सुरू असलेली पदभरती आठ महिन्यांत पूर्ण होईल. मात्र, ‘गेल्या तीन वर्षांत निवृत्तीमुळे ६० हजारांच्या आसपास पदे रिक्त झाली आहेत. त्यात आधीपासून रिक्त असलेली पदे गृहीत धरता हा बॅकलॉग दोन लाखांवर गेला आहे. तो या भरतीने कितपत भरून निघेल,’ अशी शंका देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. 

एकाच वेळेस मोठ्या संख्येने पदे भरण्यात आल्याने भविष्यात पदोन्नतीचा प्रश्न उद्भवणार आहे. एकूण पदांपैकी ५० टक्के पदेच पदोन्नतीने भरता येतात. मर्यादित संधीमुळे उमेदवारांची सेवा अडकून पडते. त्यांना एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे अडकून राहावे लागू शकते, असा धोक्याचा इशाराही देसाई यांनी दिला.

करायचे काय?
भरती नाही केली तर प्रशासकीय स्तरावर प्रश्न उपस्थित होतात आणि भरती केली तर प्रमाणापेक्षा जास्त केली म्हणून प्रश्न निर्माण होतात. या गोंधळात तरुणांचे नोकरीचे वय निघून जात आहे, अशी प्रतिक्रिया आयोगाच्या एका सदस्याने व्यक्त केली.

राज्याच्या विविध विभागांतील एकूण मंजूर पदे (यांचे वेतन राज्याच्या संचित निधीतून जाते.) 
एकूण मंजूर पदे : ७.१९ लाख 
सध्या कार्यरत असलेल्या ५.१० लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणारा खर्च : सुमारे ३४ हजार कोटी
निवृत्तिवेतनावर होणारा खर्च : सुमारे ४१ हजार कोटी

गेल्या तीन वर्षांत निवृत्त झालेले कर्मचारी
वर्ष    अ वर्ग    ब वर्ग    अराजपत्रित     लिपिक     एकूण
२०१९-२०    ३,९०३    २,१२५    १,२८८    १२,२७७    १९,५९३
२०२०-२१    २,८०१    १,८९०    १,३६२    १४,११२    २०,१६५
२०२१-२३     ३,४५९    २,३७९    २,०१०    २०,२३७    २८,०८५
एकूण     १०,१६३    ६,३९४    ४६६०    ४६,६२६    ६७,८४३    
 

Web Title: Vacancies of 'MPSC' crossed two lakhs; Whether to do mega recruitment or not, Aayeg is in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.