सुट्ट्यांमध्ये पिकनिक स्पॉट हाउसफुल्ल! बँकांची कामे लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 02:30 AM2018-01-26T02:30:14+5:302018-01-26T02:30:34+5:30
प्रजासत्ताक दिन, चौथा शनिवार आणि रविवार अशा सलग तीन सुट्ट्यांमुळे मुंबईनजीकचे पिकनिक स्पॉट हाउसफुल्ल झाले आहेत. शिवाय तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे बँकाही बंद असल्याने बँकिंगची कामे लांबणीवर पडणार आहेत.
मुंबई : प्रजासत्ताक दिन, चौथा शनिवार आणि रविवार अशा सलग तीन सुट्ट्यांमुळे मुंबईनजीकचे पिकनिक स्पॉट हाउसफुल्ल झाले आहेत. शिवाय तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे बँकाही बंद असल्याने बँकिंगची कामे लांबणीवर पडणार आहेत.
मुंबईनजीकच्या ठाणे, वसई-विरार, नवी मुंबई, लोणावळा, कोकण, रायगड येथील पिकनिक स्पॉटवर मुंबईकरांची तोबा गर्दी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अलिबागपासून रत्नागिरीला जोडून असलेल्या समुद्रकिनाºयांवरील लॉजिंग आणि बोर्डिंगची बुकिंग फुल्ल झालेली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक समुद्रकिनाºयांवर सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्याची शक्यता आहे. सोबतच लोणावळा, कर्जत या परिसरांतील गड-किल्ल्यांवर जाण्यासाठी ट्रेकर्सकडून ट्रिपचे आयोजन करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रजासत्ताकदिनी गड-किल्ल्यांवर तिरंग्यासह भगवा ध्वज फडकताना दिसतील.
थीम पार्क आणि रिसॉटर््स चालकांनी अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी प्रवेश तिकिटांवर घसघशीत सूट दिली आहे. काही रिसॉर्ट्समध्ये प्रवेश शुल्कात २० ते ३० टक्क्यांची सूट दिली जात आहे. तर बहुतेक ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक आॅफर केले आहे.
माथेरानला अधिक पसंती-
मुंबईच्या जवळ असलेल्या माथेरानला पर्यटकांची अधिक पसंती मिळत आहे. थंड हवेचे ठिकाण, फिरण्यासाठी वेगवेगळे पॉइंट यामुळे माथेरान मुंबईकरांच्या पसंतीत उतरत आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे कमीत कमी वेळेत पोहोचणे शक्य असल्याने वेळ आणि पैशांची बचत होते. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या लिस्टमध्ये माथेरानचे नाव पहिल्या स्थानावर दिसत आहे.
एलिफंटाची मेजवानी
गेल्या कित्येक दशकांपासून एलिफंटा येथील रखडलेला विजेचा प्रश्न प्रजासत्ताकदिनी मार्गी लागत आहे. त्यामुळे मुंबईकरांकडून होणाºया बुकिंगमध्ये वाढ झाल्याचे एलिफंटा येथील दुकानदारांनी सांगितले.