Join us

दिवसभरात ३३ हजार ४४ लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात मंगळवारी पार पडलेल्या ५९४व्या लसीकरण सत्रात एकूण ३३,०४४ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मंगळवारी पार पडलेल्या ५९४व्या लसीकरण सत्रात एकूण ३३,०४४ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यापैकी २६,५२२ जणांना पहिला तर ६,५२२ जणांना दुसरा डाेस देण्यात आला.

५,८२२ आऱोग्य कर्मचारी व ४,५८९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लसीचा पहिला तर ६,५०७ आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डाेस देण्यात आला. ४५ वर्षे ते ६० वर्षे या वयोगटातील सहव्याधी असलेल्या ३,८१२ लाभार्थ्यांना पहिला डाेस देण्यात आला. ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वयोगटातील १२,२९९ जणांना पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात आले. ३१,९६४ लाभार्थ्यांना कोविशिल्ड, तर १,०८० जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत १ लाख ७८ हजार ७७२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला असून आतापर्यंत एकूण १२,६६,१०८ लाभार्थ्यांना कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती आऱोग्य विभागाने दिली.

दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाची आकडेवारी

जिल्हा ४५ ते ६० ६० हून अधिकएकूण

मुंबई २०६८ ५३० २५९८

नागपूर १७० २०७२ २२४२

ठाणे २४२ १८३६ २०७८

नाशिक ११४ १०९४ १२०८

लसीचा दुसरा डोस घेण्यात आघाडीवर असलेले जिल्हे

मुंबई - २३ हजार ८४०

ठाणे - १७ हजार ६४१

पुणे - १३ हजार ८०५

आतापर्यंत लसीकरणात आघाडीवर असलेले जिल्हे

जिल्हालाभार्थी

मुंबई २ लाख २५ हजार २१५

पुणे१ लाख २६ हजार ६६३

ठाणे१ लाख १३ हजार ३४६

नागपूर ६० हजार ९०२

नाशिक ५७ हजार ३४३