राज्यात दिवसभरात ९ लाख ९० हजार जणांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:08 AM2021-08-29T04:08:34+5:302021-08-29T04:08:34+5:30

मुंबई : राज्यात शुक्रवारी ९ लाख ९० हजार ४६५ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली, तर आतापर्यंत राज्यात एकूण ...

Vaccinate 9 lakh 90 thousand people in the state every day | राज्यात दिवसभरात ९ लाख ९० हजार जणांना लस

राज्यात दिवसभरात ९ लाख ९० हजार जणांना लस

googlenewsNext

मुंबई : राज्यात शुक्रवारी ९ लाख ९० हजार ४६५ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली, तर आतापर्यंत राज्यात एकूण ५ कोटी ६३ लाख ३२ हजार ७५५ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी ७७ लाख ७३ हजार २९६ जणांनी लसीचा पहिला डोस, तर १८ लाख २४ हजार ४०७ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात ४५ हून अधिक वय असलेल्या २ कोटी ३२ हजार ५४१ जणांनी लसीचा पहिला डोस, तर १ कोटी ८६ लाख २ हजार ५० जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

राज्यात १२ लाख ९२ हजार ३९५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ९ लाख ८५ हजार ५५४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख ३७ हजार ७२३ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर १४ लाख २३ हजार ७८९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

Web Title: Vaccinate 9 lakh 90 thousand people in the state every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.