दिवसभरात २ लाख ७४ हजारांहून अधिक जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:07 AM2021-03-19T04:07:12+5:302021-03-19T04:07:12+5:30
मुंबई : राज्यात बुधवारी २ लाख ७४ हजार ३७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. यात २ लाख २२ हजार ७७१ ...
मुंबई : राज्यात बुधवारी २ लाख ७४ हजार ३७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. यात २ लाख २२ हजार ७७१ जणांना कोविशिल्ड तर ५१,०६६ जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली. आतापर्यंत राज्यात ३६ लाख ३९ हजार ९८९ जणांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आराेग्य विभागाने दिली.
राज्यात बुधवारी मुंबईत ७ लाख २९ हजार २४७, पुण्यात ४ लाख ७६७, ठाण्यात २ लाख ८७ हजार १०८, नागपूरमध्ये २ लाख १८ हजार २२९ तर नाशिकमध्ये १ लाख ७९ हजार ९०५ जणांना लस देण्यात आली. अजूनही काही जिल्ह्यांमध्ये मंद गतीने लसीकरण होत असल्याचे चित्र आहे. चार जिल्ह्यांत अजूनही ३० हजार लाभार्थ्यांचेही लसीकरण पूर्ण झालेले नाही. त्यानुसार गडचिरोली २७ हजार २, हिंगोली २४ हजार ४३८, वाशिम २६ हजार ९२७ आणि सिंधुदुर्गमध्ये २४ हजार १०२ जणांना लस देण्यात आली.
........................