Join us

राज्यात दिवसभरात ४ कोटी २७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:05 AM

मुंबई : राज्यात दिवसभरात ३ लाख ४८ हजार ५७७ लाभार्थ्यांचे लसीकरण कऱण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ४ ...

मुंबई : राज्यात दिवसभरात ३ लाख ४८ हजार ५७७ लाभार्थ्यांचे लसीकरण कऱण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ४ कोटी २७ लाख ७ हजार ३१२ लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

राज्यात १२ लाख ८६ हजार ३४८ आऱोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ९ लाख ७ हजार ३५० आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख १६ हजार २६९ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर ११ लाख ४७ हजार ३०५ फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ७७ लाख ८१ हजार ७५ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ७९ लाख २३ हजार ५४७ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी १० लाख ५ हजार ५४५ लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ५ लाख ३९ हजार ३७३ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

जिल्हा लाभार्थी

मुंबई ७१९७७६१

पुणे ६०६७४०३

ठाणे ३३४८७३२

कोल्हापूर १७५८८१९

नागपूर २३५८६२१