राज्यात दिवसभरात ४ लाखांहून अधिक जणांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:04 AM2021-07-25T04:04:57+5:302021-07-25T04:04:57+5:30
मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात ४ लाख ३० हजार ७४३ जणांचे लसीकरण करण्यात आले. तर आतापर्यंत राज्यात एकूण ४ ...
मुंबई : राज्यात शुक्रवारी दिवसभरात ४ लाख ३० हजार ७४३ जणांचे लसीकरण करण्यात आले. तर आतापर्यंत राज्यात एकूण ४ कोटी ८ लाख ५६ हजार ७३९ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
राज्यात १२ लाख ८५ हजार १३७ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ८ लाख ९३ हजार १९५ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख १२ हजार ८८६ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर १० लाख ९३ हजार ५४० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ७५ लाख ५७ हजार ४९६ जणांनी लसीचा पहिला डोस, तर ७२ लाख ७० हजार ८५८ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी २० लाख ५ हजार ८६ जणांनी लसीचा पहिला डोस, तर ४ लाख ३८ हजार २६३ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
जिल्हा लाभार्थी
मुंबई ६९०११६८
पुणे ५८१३८८४
ठाणे ३१७३६१५
कोल्हापूर १६९९६४०
नागपूर २२२५९१४