मुंबई : राज्यात शुक्रवारी ६ लाख ७६ हजार २०८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. तर आतापर्यंत राज्यात एकूण ४ कोटी ३७ लाख ६५ हजार ३७३ जणांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.
राज्यात १२ लाख ८७ हजार ४०२ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ९ लाख १४ हजार ३८४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. २१ लाख १९ हजार ६८४ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस तर ११ लाख ७३ हजार ६६७ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील १ कोटी १४ लाख ५५ हजार ८९० जणांनी लसीचा पहिला डोस, तर ६ लाख ६ हजार २६५ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
राज्यात ४५ हून अधिक वय असणाऱ्या १ कोटी ९३ लाख ६१० लाभार्थ्यांनी लसीचा पहिला डोस, तर ८२ लाख ७७ हजार ४७१ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
जिल्हा लाभार्थी
मुंबई ७३४०८४९
पुणे ६२३७०६५
ठाणे ३४४००८०
कोल्हापूर १७००५८०
नागपूर २४०४४३१