लस द्या, अन्यथा काम बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:09 AM2021-05-05T04:09:40+5:302021-05-05T04:09:40+5:30
एअर इंडियाच्या वैमानिकांचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एअर इंडियाच्या अखत्यारीतील सर्व वैमानिक आणि केबिन क्रू मेंबर्सचे प्राधान्याने ...
एअर इंडियाच्या वैमानिकांचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एअर इंडियाच्या अखत्यारीतील सर्व वैमानिक आणि केबिन क्रू मेंबर्सचे प्राधान्याने लसीकरण करा, अन्यथा काम बंद करण्याचा इशारा इंडियन कमर्शिअल पायलट असोसिएशनने (आयसीपीए) दिला आहे.
कोरोनाकाळात सुरुवातीपासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी अविरत सेवा दिली आहे. ‘वंदे भारत’सारख्या अभियानाच्या यशस्वीतेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. असे असतानाही त्यांच्या समस्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले जात आहे. प्रवासादरम्यान विमान कर्मचारी असंख्य प्रवाशांच्या संपर्कात येतात. परिणामी त्यांना कोरोनाची लागण होण्याची सर्वाधिक भीती आहे. त्यामुळे त्यांना लसीकरणात प्राधान्य देण्याची गरज असतानाही टाळाटाळ करण्यात आली. मात्र, येत्या काही दिवसांत एअर इंडियाने संपूर्ण देशभरात विमान कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची व्यवस्था न केल्यास काम बंद करण्यात येणार असल्याची माहिती आयसीपीएचे सरचिटणीस टी. प्रवीण कीर्थी यांनी दिली.
एअर इंडियाचे देशभरातील १ हजार वैमानिक आयसीपीएचे सभासद आहेत. या सर्वांनी काम बंद केल्यास हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम होईल. शिवाय वंदे भारत अभियान, वैद्यकीय मदतीच्या वाहतुकीलाही फटका बसेल, अशी भीती वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केली.
.......................................