राज्यात दिवसभरात ३७ हजार २२३ कर्मचाऱ्यांना लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:08 AM2021-02-11T04:08:12+5:302021-02-11T04:08:12+5:30
मुंबई : राज्यात बुधवारी ८०९व्या लसीकरण सत्रात एकूण ३७ हजार २२३ कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात २० हजार चार ...
मुंबई : राज्यात बुधवारी ८०९व्या लसीकरण सत्रात एकूण ३७ हजार २२३ कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले. त्यात २० हजार चार आरोग्य कर्मचारी, तर १७ हजार २१९ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. ३७ हजार ९४ कर्मचाऱ्यांना कोविशिल्ड लसीने, तर १२९ लाभार्थींना कोव्हॅक्सिन लसीने लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत पाच लाख ७३ हजार ६६६ लाभार्थींना कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. त्यापैकी पाच हजार १४९ लाभार्थींना कोव्हॅक्सिन लस देण्यात आली.
राज्यात बुधवारी लसीकरणाला सर्वाधिक प्रतिसाद ठाण्यात मिळाला. या ठिकाणी एकूण तीन हजार ८३० लाभार्थींना लस देण्यात आली. त्याखालोखाल, पुण्यात तीन हजार ४५८, अहमदनगर तीन हजार २१७ आणि मुंबई उपनगरात तीन हजार ६० लाभार्थींनी लस घेतली आहे. दिवसभरात सर्वांत कमी प्रतिसाद भंडारा जिल्ह्यात दिसून आला, या जिल्ह्यात दिवसभरात केवळ १०९ लाभार्थींनी लस घेतली. त्याप्रमाणेच, वाशिममध्ये २०१, उस्मानाबाद २४९ आणि लातून येथे २९० लाभार्थींनी लस घेतल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
लसीकरणाची आतापर्यंतची आकडेवारी ( सर्वाधिक लसीकरण लाभार्थी)
जिल्हा लाभार्थी
मुंबई उपनगर ६१ हजार १७७
ठाणे ५४ हजार २८७
पुणे ५२ हजार५९५
मुंबई शहर २९ हजार ३५६
नागपूर २६ हजार ८०