लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात बुधवारी ५२८ केंद्रांच्या माध्यमातून ४१,४७० आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात आले, हे प्रमाण ७७ टक्के इतके आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ७८ हजार ३७१ कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. दिवसभरात सर्वाधिक लसीकरण गडचिरोली जिल्ह्यात १२६ टक्के झाले असून त्यापाठोपाठ सातारा, धुळे, जालना, बुलडाणा आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झाले, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
* कोवॅक्सिन लस देण्यात अमरावती आघाडीवर
राज्यात सहा ठिकाणी कोवॅक्सिन लस देण्यात येत आहे. त्यातील अमरावती जिल्ह्यात बुधवारी १०० जणांना, पुणे येथे १७, मुंबई १८, नागपूर ४०, सोलापूर ७ आणि औरंगाबाद ३७ अशा २१९ जणांना ही लस देण्यात आली.
------------------