Join us

राज्यात ५० लाखांहून अधिक जणांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात मंगळवारी २ लाख ७० हजार ९३७ जणांना लस देण्यात आली. २ लाख ९ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मंगळवारी २ लाख ७० हजार ९३७ जणांना लस देण्यात आली. २ लाख ९ हजार ६३० जणांनी कोविशिल्ड तर ६१,३०० जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली. आतापर्यंत राज्यात ५० लाख ५१ हजार ३३९ लाभार्थ्यांना लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

देशस्तरावर ५० लाख लाभार्थ्यांना टप्पा पूर्ण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असून, भविष्यात लसीकरण मोहिमेचा वेगाने विस्तार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले. मुंबईत मंगळवारी ३४,६३३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील ३० हजार ७१५ जणांना पहिला तर ३ हजार ९१८ लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. मुंबईत आतापर्यंत एकूण ९ लाख ७३ हजार ८२३ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.